शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Satara: सारोळा पुलावरून उडी मारलेल्या युवकाचा मृतदेह सापडला, गेल्या चार दिवसांपासून सुरू होती शोधमोहीम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2023 12:27 IST

शिरवळ : पुणे-सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या सारोळा पुलावर मध्यभागी दुचाकी लावत नीरा नदीपात्रात उडी मारलेल्या नीलेश महादेव काकडे (वय ४०, ...

शिरवळ : पुणे-सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या सारोळा पुलावर मध्यभागी दुचाकी लावत नीरा नदीपात्रात उडी मारलेल्या नीलेश महादेव काकडे (वय ४०, मूळ रा. ओगलेवाडी हजारमाची, ता. कऱ्हाड, सध्या रा. जाधववाडी, पिंपरी चिंचवड, पुणे) याचा मृतदेह शोधण्यात महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड सर्च ॲण्ड रेस्क्यू टीम, शिरवळ रेस्क्यू टीमच्या पथकाला चौथ्या दिवशी यश आले.याबाबतची माहिती अशी की, पुणे येथे माथाडी कामगार म्हणून आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये कार्यरत असणारे नीलेश काकडे यांचा पत्नी पल्लवी काकडे हिच्याशी १ ऑगस्ट रोजी किरकोळ वाद झाला. त्यानंतर पत्नी पल्लवी ही मुलीसमवेत निघून गेल्याची फिर्याद पिंपरी चिंचवड येथील चिखली पोलिस ठाण्यात ४ ऑगस्ट रोजी नीलेश काकडे यांनी दिली होती.नीलेश काकडे तेव्हापासून मेहुणे प्रवीण लंगडे यांच्याकडे राहण्याकरिता म्हसवडला होते. दरम्यान, मंगळवार, ८ ऑगस्ट रोजी नीलेश काकडे कंपनीमध्ये जाण्याकरिता दुचाकी (एमएच ५० - व्ही १३४७)वरून म्हसवड येथून पुणेकडे निघाले होते. यावेळी नीलेश काकडे यांनी सारोळा पुलावर पुण्याहून साताऱ्याला जाणाऱ्या दिशेस आपली दुचाकी लावल्याचे निदर्शनास आले होते.नीलेश यांचा दूरध्वनी बंद असल्यामुळे प्रवीण लंगडे हेही शोध घेत होते. दरम्यान, नीलेश यांनी सारोळा पुलावरून नीरा नदीपात्रात उडी मारल्याची शक्यता व्यक्त होत असतानाच चौथ्या दिवशी महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड सर्च ॲण्ड रेस्क्यू टीम आणि शिरवळ रेस्क्यू टीमच्या अथक प्रयत्नांना चौथ्या दिवशी यश आले. नीलेश यांचा मृतदेह आढळल्यानंतर शवविच्छेदन शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी करण्यात येऊन मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी शिरवळ पोलिस स्टेशनला नोंद झाली असून, राजगड पोलिस ठाण्याला वर्ग केली आहे.

रेस्क्यू टीमकडून शोधमोहीमसारोळा पुलावरून नीलेश काकडे यांनी उडी मारल्याची शक्यता गृहीत धरून दोन दिवसांपासून महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड सर्च ॲण्ड रेस्क्यू टीम, महाबळेश्वर व शिरवळ रेस्क्यू टीम यांच्याकडून गेल्या चार दिवसांपासून शोधमोहीम सुरू होती. अखेर त्याला यश आले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरDeathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस