शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ऊस दर: सातारा जिल्ह्यात पहिल्या उचलचा मध्य ३२००-३३०० ठरणार

By नितीन काळेल | Updated: December 1, 2023 18:44 IST

शेतकरी संघटनांना ३१०० अमान्यच : दोन पावले काखान्यांनी पुढे येण्याची संघटनांची भूमिका

सातारा : जिल्ह्यातील बहुतांशी साखर कारखान्यांनी पहिली उचल ३००० ते ३१०० रुपये जाहीर केली असलीतरी शेतकरी संघटनांना अमान्य आहे. त्यामुळे ऊसदराचा तिढा कायम असून गाळप आनंदाने करायचे असेलतर कारखानदारांनी दोन पावले पुढे यावे, आम्ही दोन पावले मागे घेऊ अशी भूमिका संघटनांनी ठेवली आहे. त्यामुळे दराचा तोडगा ३२००-३३०० पर्यंत गेल्यास शेतकरी संघटनाही राजी होऊ शकतात. यासाठी प्रशासनानेही पावले उचलण्याची गरज आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसदराचे आंदोलन संपले. त्यामुळे तेथील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम वेगाने सुरू आहे. सातारा जिल्ह्यातीलही जवळपास सर्वच साखर कारखान्यांनी गाळपास सुरूवात केली आहे. पण, या गाळपावरही शेतकरी आंदोलनाचे सावट आहे. कारण, साखर कारखान्यांनी पहिली उचल जाहीर केली असलीतरी त्यावर शेतकरी संघटनांचे समाधान झालेले नाही. त्यामुळे येत्या दोन दिवसांत शेतकरी संघटना कोणता पवित्रा घेणार याकडे लक्ष लागलेले आहे. त्यातच साताऱ्याबरोबरच सांगली जिल्ह्यातील ऊस दराचाही तिडा आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यात एकाचवेळी शेतकरी संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली साखर कारखानदार प्रतिनिधी, शेतकरी संघटनांचे पदाधिकारी यांची बैठक झाली. यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या ठाम भूमिकेमुळे कारखान्यांना उसाचा पहिला हप्ता जाहीर करावा लागला. त्यामध्ये सर्वांनी एकमत करत ३ हजार १०० रुपये दर जाहीर केला. मात्र, शेतकरी संघटनांनी ३ हजार ५०० रुपयांची मागणी कायम ठेवली. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी बोलविलेली बैठक दरावर तोडगा न निघाल्याने निष्फळ ठरली.

या बैठकीनंतर शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत बळीराजा अडचणीत असताना त्यांना साखर कारखानदारांनी आधार द्यायला हवा. यासाठी ३ हजार ५०० रुपये पहिली उचल दिलीच पाहिजे. अन्यथा दोन दिवसांत गनिमी काव्याने आंदोलन सुरू करु. तसेच कारखान्यांचा गाळप हंगाम बंद पाडण्याचा इशारा दिला. असे असतानाच यानंतरच जिल्ह्यातील अन्य काही साखर कारखान्यांनीही दर जाहीर केले. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांचा पहिला हप्ता हा ३ हजार ते ३ हजार १०० रुपयांच्या दरम्यान राहिला आहे. याला शेतकरी संघटनांचा विरोध आहे. त्यामुळे साखर कारखान्यांचे गाळप सुरळीत राहणार का ? याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे.

सोयाबीन अन् दुधाला दर मिळत नाही म्हणून शेतकऱ्यांनी दिवाळी साजरी केली नाही. आता साखर कारखानदारांना विनंती आहे की, त्यांनी उसाला दर देऊन शेतकऱ्यांना आधार द्यावा. यासाठी त्यांनी उसाची पहिली उचल देण्यासाठी दोन पावले पुढे यावे. आम्हीही दोन पावले मागे येऊ. नाहीतर आम्हाला ३१०० रुपये दर मान्यच नाही. ऊसदरावर तोडगा निघाला तरच गळीत हंगामही सुरळीत होईल. नाहीतर आम्हीही मागे हटणार नाही. राष्ट्रीय महामार्गही अडवू. त्याचबरोबर दरासाठी आरापारची लढाईही करु. - राजू शेळके, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स :Satara areaसातारा परिसरsugarcaneऊसSugar factoryसाखर कारखानेSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना