शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक व्यवस्थेत तात्पुरता बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:34 IST

सातारा : सातारा जिल्ह्यात दि. १८ जानेवारी रोजी ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणीच्या अनुषंगाने सातारा शहर श्री छत्रपती शाहू क्रीडासंकुल ...

सातारा : सातारा जिल्ह्यात दि. १८ जानेवारी रोजी ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणीच्या अनुषंगाने सातारा शहर श्री छत्रपती शाहू क्रीडासंकुल परिसरातील वाहनधारकांच्या व पादचाऱ्यांच्या सुर‍क्षिततेच्या दृष्टीने परिसरातील वाहतुकीचे नियमन करणे आवश्यक आहे. वाहतुकीच्या नियमनाकरिता श्री छत्रपती शाहू क्रीडासंकुल परिसरातील वाहतूक मार्गात बदल तसेच पार्किंग व्यवस्थेत बदल करण्यात आल्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांनी दिले आहेत.

वाहतूक मार्गातील ताप्तुरते बदल- सातारा श्री छत्रपती शाहू क्रीडासंकुलकडे जाणारा मार्ग हा सुभाषचंद्र बोस चौक, एस.टी. स्टॅण्ड इनगेट येथून मतमोजणी केंद्राकडे जाणारे सर्व प्रकारच्या वाहनांकरिता वाहतुकीसाठी बंद राहील.

पर्यायी मार्ग - मेढा, महाबळेश्वर, जुना हायवेमार्गे येणाऱ्या सर्व एस.टी. बसेस तसेच सर्व वाहने एस.टी.स्टॅण्ड येथे जाण्याकरिता भूविकास बँक, जुना आर.टी.ओ. चौकमार्गे येजा करतील. वाढेफाटामार्गे येणारी सर्व वाहने एस.टी.स्टॅण्ड येथे जाण्याकरिता जुना आर.टी.ओ. चौक येथून पारंगे चौकमार्गे येजा करतील. एस.टी. बसेस पारंगे चौक येथे एस.टी. स्टॅण्ड इनगेटमार्गे येजा करतील. इतर सर्व वाहने पारंगे चौक येथून पोवईनाका तहसीलदार ऑफिसमार्गे एस.टी.स्टॅण्ड येथे येजा करतील.

बॉम्बे रेस्टॉरंट, शिवराजफाटा येथून मोळाचा ओढाकडे जाणारे सर्व वाहनांनी राधिका रोडमार्गाचा वापर करावा. वाहनांचे पार्किंग शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे दुचाकी, चारचाकीकरिता एस.टी. स्टॅण्डसमोर असणारे महसूल विभागाचे पार्किंग जागेत व्यवस्था करण्यात आली आहे. ग्रामपंचायत निवडणूक निकालाकरिता आलेल्या नागरिकांचे सर्व प्रकारच्या वाहनांंकरिता पूर्वीचे भूविकास बँकेच्या मोकळ्या मैदानावर पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. या बदलाची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी.