शिक्षकांनी समाजाला चांगली दिशा द्यावी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:46 IST2021-09-08T04:46:40+5:302021-09-08T04:46:40+5:30

कऱ्हाड पंचायत समितीच्यावतीने देण्यात येणाऱ्या दिवंगत यशवंतराव चव्हाण गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. बचत भवन ...

Teachers should give good direction to the society! | शिक्षकांनी समाजाला चांगली दिशा द्यावी!

शिक्षकांनी समाजाला चांगली दिशा द्यावी!

कऱ्हाड पंचायत समितीच्यावतीने देण्यात येणाऱ्या दिवंगत यशवंतराव चव्हाण गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. बचत भवन सभागृहात हा समारंभ पार पडला. जिल्हा परिषदेच्या अर्थ व शिक्षण समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, प्राचार्य गणपतराव कणसे, सभापती प्रणव ताटे, उपसभापती रमेश देशमुख, विनिता पलंगे, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, सुरेखा जाधव, सागर शिवदास, रमेश चव्हाण, शरद पोळ, काशिनाथ कारंडे, नामदेव पाटील, उत्तमराव पाटील, शबनम मुजावर, शिक्षण विस्तार अधिकारी जमीला मुलाणी, रमेश कांबळे, संमती देशमाने, शालेय पोषण आहार अधीक्षक विजय परीट आदींची प्रमुख उपस्थिती होती.

शिक्षक गुणगौरव समारंभात प्राचार्य गणपतराव कणसे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी कणसे यांनी शिक्षक दिनासंदर्भात सविस्तर माहिती देत शिक्षकांची कर्तव्ये, शिक्षणाचा प्रवास याविषयी माहिती दिली. पुरस्कारप्राप्त शिक्षकांच्यावतीने हणमंत काटे, विक्रम पाटील, माधवी चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. अंध विद्यार्थिनी ज्योती पंडित मोहिते हिचा राज्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळविल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच चोवीस केंद्र व आठ इतर अशा एकूण बत्तीस शिक्षकांना तालुकास्तरीय ‘यशवंतराव चव्हाण गुणवंत शिक्षक पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.

अनंत आघाव व वैशाली रोकडे यांनी सूत्रसंचालन केले. शिक्षण विस्तार अधिकारी रमेश कांबळे यांनी आभार मानले.

- चौकट

यशवंत पॅटर्नचा प्रारंभ

शिक्षक दिनाचे औचित्य साधून पंचायत समितीच्यावतीने विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाला पूरक असा ‘यशवंत पॅटर्न’ सुरू करण्यात आला आहे. त्याचा मान्यवरांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना दररोज ऑनलाईन व्हिडिओसह चाचणी सोडवायला मिळणार आहे.

फोटो : ०७केआरडी०२

कॅप्शन : कऱ्हाड पंचायत समितीच्यावतीने आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते गुणवंत शिक्षक पुरस्काराचे थाटात वितरण करण्यात आले.

Web Title: Teachers should give good direction to the society!