शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

‘पैसे घ्या, पण पिण्याचे पाणी द्या’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 4:05 PM

यावर्षी तारळी प्रकल्पाचे पाणी पिण्यासाठी द्या, पिण्याच्या पाण्यासाठी लागणारे पैसे भरण्याची ही तयारी आहे. मात्र, टँकर नको कॅनालद्वारे पाणी द्या, अशी मागणी धोंडेवाडीसह मानेवाडी, तुपेवाडी, दातेवाडी, दगडवाडी, पळसगाव, कातरखटाव, सूर्याचीवाडी, पिंपरी या

ठळक मुद्देतारळी, उरमोडी प्रकल्प । धोंडेवाडीसह नऊ गावांची पैसे भरण्याची तयारी, पिकांना मिळेना पाणी

संदीप कुंभार ।मायणी : सध्या उन्हाची तीव्रता खूप वाढत चालली आहे. त्यामुळे धोंडेवाडीसह नऊ गावांतील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. या ग्रामस्थांनी तारळी प्रकल्पाचे पिण्याचे पाणी देण्यासाठी ‘पैसे घ्या, पण कॅनालद्वारे पाणी द्या,’ अशी विनंती तारळी व उरमोडीप्रकल्प अधिकऱ्यांकडे केली आहे.

खटाव तालुक्याचा पूर्व भागाचा शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी दोन दशकांपूर्वी तारळी उपसा सिंचन योजना या प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली होती. मात्र, या प्रकल्पाला दोन दशके होऊन गेली तरी या प्रकल्पाचे काम अद्याप अपूर्णच आहे. त्यामुळे आजही उन्हाळा आला की, या भागातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी शासनाकडे टँकरची मागणी करावी लागत आहे.

यावर्षी तारळी प्रकल्पाचे पाणी पिण्यासाठी द्या, पिण्याच्या पाण्यासाठी लागणारे पैसे भरण्याची ही तयारी आहे. मात्र, टँकर नको कॅनालद्वारे पाणी द्या, अशी मागणी धोंडेवाडीसह मानेवाडी, तुपेवाडी, दातेवाडी, दगडवाडी, पळसगाव, कातरखटाव, सूर्याचीवाडी, पिंपरी या नऊ गावांनी तारळी व उरमोडी प्रकल्प अधिकाऱ्यांकडे केली आहे.

खटाव व माण तालुक्यांतील एकूण आठ हजार ८७६ हेक्टर इतक्या अवर्षणप्रवण क्षेत्राला सिंचनाचा लाभ तारळी प्रकल्पामुळे मिळणार आहे. त्यासाठी आजवर चारवेळा प्रशासकीय मान्यता घेण्यात आली. या मान्यतेमुळे प्रकल्पांतर्गत रखडलेले भूसंपादन, पुनर्वसन व २६ किलोमीटर कालव्याचे काम पूर्ण झाले. खटाव पूर्वभागात इतकाच दुष्काळी भाग हा माण तालुक्यातील आहे.

या माण तालुक्यातील अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी १४ मे पासून पाणी दिले जात आहे. मात्र, तेव्हापासून खटाव पूर्व भागाला पाणी द्यावे, अशी मागणी या नऊ गावांतील ग्रामस्थ करीत असताना सुद्धा याकडे प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष होताना दिसत आहे.

नऊ गावांतील ग्रामस्थांनी अनेकवेळा तारळी प्रकल्प अधिकारी उरमोडी प्रकल्प अधिकाºयांच्या कार्यालयात हेलपाटे घातले आहेत. संबंधित अधिका-यांकडून अनेकवेळा त्यांना सकारात्मक उत्तर मिळत असले तरी कारवाई मात्र आजपर्यंत झालेली नाही. त्यामुळे नक्की या उन्हाळ्यात पाणी पिण्यासाठी मिळणार की नाही, हा मात्र प्रश्न सध्यातरी मागे लागताना दिसत नाही. उन्हाळ्यात शेती केली जात नाही. त्यामुळे फक्त पिण्याच्या पाण्याची गरज आहे. या भागात पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू नाहीत. यामुळे शासनाचा यावर्षीचा खर्चही वाचला आहे. सध्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर झाला आहे.

काम अजून अपूर्णधोंडेवाडीसह गावातील कॅनॉलचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, याच प्रकल्पाअंतर्गत असलेल्या अनफळे, मोराळे, मायणी व मरडवाक या गावांचा परिसरातील कॅनॉलची कामे अजून अपूर्ण आहेत. तर काही ठिकाणी काम सुरूही झाले नाही. त्यामुळे हे काम केव्हा पूर्ण होणार, असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.

 

या वर्षी शेतकऱ्यांनी पाण्यासाठी प्रकल्प अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून पैसे भरण्याची तयारी केली. मात्र, अधिकाºयांनी पुढील सूचनेअभावी हे पैसे असूनही पैसे भरायचे तरी कोठे? हा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी लॉकडाऊन आहे. लॉकडाऊन संपल्यावर अधिकार यांच्याविरुद्ध तीव्र आंदोलन उभे करून त्यांना तालुका बंदी केली जाईल.- हणमंत भोसले,उपसरपंच, धोंडेवाडी, तालुका खटाव

 

तारळी प्रकल्प व उरमोडी प्रकल्प विभागातील दोन्ही अधिकाऱ्यांचे एकमेकांशी समन्वय नाही. त्यामुळे दोन्ही विभागाकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. यामुळे नेमके पाणी यावर्षी तरी देणार का, हा प्रश्न निर्माण झाला आहे.- रामचंद्र घोलप, सामाजिक कार्यकर्ते

 

टॅग्स :water transportजलवाहतूकSatara areaसातारा परिसर