जयकुमार गोरे यांची बदनामी करणाऱ्या महिलेवर कारवाई करा, सातारा जिल्हा प्रशासनास महिलांचे निवेदन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 13:14 IST2025-03-08T13:13:15+5:302025-03-08T13:14:51+5:30
सातारा : ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एक महिला जाणूनबुजून चिखलफेक करून त्यांची बदनामी करत आहे. त्या महिलेवर कारवाई करून ...

जयकुमार गोरे यांची बदनामी करणाऱ्या महिलेवर कारवाई करा, सातारा जिल्हा प्रशासनास महिलांचे निवेदन
सातारा : ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एक महिला जाणूनबुजून चिखलफेक करून त्यांची बदनामी करत आहे. त्या महिलेवर कारवाई करून तिला अटक करावी, अशी मागणी साताऱ्यातील महिलांनी जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे केली.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत स्पष्टपणे सांगितले आहे की, २०१६ मध्ये सदर महिला त्यांना ब्लॅकमेल करत होती. तिने त्यांच्या विरुद्ध कोर्टामध्ये दावा दाखल केला होता; परंतु कोर्टाने जयकुमार गोरे यांची निर्दोष मुक्तता केली आहे.
तरीही दहा वर्षांनी पुन्हा एकदा या महिलेने त्यांची बदनामी सुरू केली आहे. या महिलेची सखोल चौकशी करावी. महिलेने आजपर्यंत किती जणांना ब्लॅकमेल केले, किती जणांकडून पैसे उकळले याचीसुद्धा माहिती घ्यावी. हे प्रकरण दहा वर्षांनी पुन्हा एकदा उकरून काढण्यापाठीमागे आणखी कोण आहेत याचीही माहिती घ्यावी. या महिलेवर आणि तिला हे करण्यास प्रवृत्त करणाऱ्या सर्वांवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी सिद्धी पवार, रेणूताई येळगावकर, कविता कचरे, चित्रलेखा कदम, सुनिषा शहा, वैष्णवी कदम, वैशाली टंगसाळे, रिना भणगे, कुंजा खंदारे, सविता पवार, नयना कांबळे, उषा ओंबळे, कविताताई शिर्के, अंजली जाधव, सीमा घार्गे, रोहिणी क्षीरसागर आणि महिला उपस्थित होत्या.