Satara: पर्यंती येथे मायलेकीचा संशयास्पद मृत्यू, खून की आत्महत्या; पोलिसांकडून तपास सुरू

By दत्ता यादव | Updated: December 21, 2023 13:40 IST2023-12-21T13:39:43+5:302023-12-21T13:40:40+5:30

सातारा : माण तालुक्यातील पर्यंती या गावातील मायलेकीचा राहत्या घरात संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला. ही आत्महत्या की खून, या निष्कर्षापर्यंत पोलिस पोहोचले नसून, घटनास्थळी डाॅग स्काॅड, फाॅरेन्सिक तज्ज्ञ कसून तपास करत ...

Suspicious death of Mileki in Satara District, Police are investigating | Satara: पर्यंती येथे मायलेकीचा संशयास्पद मृत्यू, खून की आत्महत्या; पोलिसांकडून तपास सुरू

Satara: पर्यंती येथे मायलेकीचा संशयास्पद मृत्यू, खून की आत्महत्या; पोलिसांकडून तपास सुरू

सातारा : माण तालुक्यातील पर्यंती या गावातील मायलेकीचा राहत्या घरात संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला. ही आत्महत्या की खून, या निष्कर्षापर्यंत पोलिस पोहोचले नसून, घटनास्थळी डाॅग स्काॅड, फाॅरेन्सिक तज्ज्ञ कसून तपास करत आहेत. ही धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे माण तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.

आई संपताबाई लक्ष्मण नरळे (वय ७५), मुलगी नंदाबाई भिकू आटपाडकर (वय ५८, दोघीही रा. पर्यंती, ता. माण, जि. सातारा) अशी मृत मायलेकींची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संपताबाई आणि नंदाबाई या दोघीच घरात राहत होत्या. गुुरुवारी सकाळी दोघींचेही मृतदेह संशयास्पद स्थितीत राहत्या घरात आढळून आल्यानंतर काही नागरिकांनी या घटनेची माहिती म्हसवड पोलिसांना दिली. 

पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दोघींच्याही तोंडातून फेस येत असल्याचे पोलिसांना दिसून आले. त्यांचा गळा आवळून खून झाला आहे की, त्यांनी आत्महत्या केली आहे, हे समोर आले नाही. दोन्हीही मृतदेह अद्यापही घटनास्थळीच आहेत. पंचनामा झाल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात येणार असल्याचे म्हसवड पोलिसांनी सांगितले.

Web Title: Suspicious death of Mileki in Satara District, Police are investigating