शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

तुषारच्या खूनप्रकरणीही पोळवर संशय

By admin | Updated: August 20, 2016 00:19 IST

तुषार धोम येथे पोळच्या पोल्ट्रीवर करायचा काम...

मुराद पटेल -- शिरवळ --सहा खून प्रकरणात अटकेत असलेल्या संतोष पोळ याची अनेक प्रकरणे बाहेर पडत असताना त्याच्या अनेक कारनामे उघडकीस येऊ लागले आहेत. यामध्येच वाई याठिकाणी घोटावडेकर यांच्या रुग्णालयात रुग्ण महिलेच्या विनयभंगप्रकरणी नातेवाइकांच्या मारहाणीत जखमी झालेल्या व वार्डबॉय म्हणून काम करणाऱ्या तुषार रवींद्र जाधव याच्या खून प्रकरणालाही वेगळे वळण मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.घोटवडेकर रुग्णालयात वार्डबॉय म्हणून अतिदक्षता विभागात संतोष पोळ याच्याबरोबर कार्यरत असलेला तुषार ऊर्फ सोनू रवींद्र जाधव ( वय २५, रा. रविवार पेठ, वाई) याला रुग्णालयात रुग्ण महिलेच्या छेडछाडप्रकरणी दि. २५ मे २०१४ रोजी नातेवाइकांकडून मारहाण होत जखमी झाला होता. यावेळी त्याठिकाणी प्रत्यक्षदर्शी म्हणून संतोष पोळ हा त्याठिकाणी हजर होता. यावेळी जखमी झालेल्या तुषार जाधव याचा काही तासांच्या अवधीनंतर संशयास्पदरीत्या मृत्यू झाला होता. यावेळी रुग्ण महिलेच्या नातेवाइकांच्या मारहाणीमध्येच तुषार जाधव याचा मृत्यू झाल्याचा दावा संतोष पोळ याने केल्यानंतर नातेवाइकांवर वाई पोलिस स्टेशनला खुनाचा गुन्हाही दाखल केला होता. यामध्ये राहुल विलास डेरे (वय ३३), गणेश प्रकाश डेरे (२०), संदीप विष्णू डेरे (३६), सतीश रमेश डेरे (४०), प्रकाश तुकाराम डेरे (५७), सुधीर बाळकृष्ण सुतार (२२), विलास तुकाराम डेरे (६०, सर्व रा. कवठे, ता. वाई) यांच्यावर तुषार जाधव याच्या मृत्यूप्रकरणी वाई येथील पोलिस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणामध्ये संतोष पोळ याच्या संशयास्पद हालचाली पाहता या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी तुषारची आई नंदा जाधव यांनी केली आहे. या प्रकरणात संतोष पोळ याच्यासह डॉक्टरांची चौकशीची मागणी पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे करणार असल्याचे सूतोवाच नंदा जाधव यांनी केले आहे. तुषार धोम येथे पोळच्या पोल्ट्रीवर करायचा काम...खूनप्रकरणी अटकेत असलेल्या संतोष पोळ याचे धोम येथील पोल्ट्री फार्म हे कब्रस्थान असल्याचे सिद्ध झाल्यानंतर संशयास्पदरीत्या मृत्यू झालेल्या तुषार जाधव हा पोल्ट्री फार्मवर दिवसा काम करत असल्याचे व रात्रीच्या वेळेस डॉ. घोटवडेकर यांच्या रुग्णालयात काम करत होता, असे सांगत नंदा जाधव यांनी अनेक गौप्यस्फोट केले आहे. तुषार मरणाअगोदर एक दिवसआधी ड्यूटीवरून आल्यानंतर काहीसा तणावाखाली होता. त्यामध्येच २५ रोजी संतोष पोळ याचा सकाळी फोन आल्यानंतर तुषार हा रुग्णालयात चांगला ठणठणीत गेला होता. त्यानंतर काही तासांनंतर रुग्णालयातील कर्मचारी हे मला घरी घेण्यासाठी आले व तुषार चिंताजनक असल्याचे सांगतात. मी रुग्णालयात गेल्यानंतर पोळने तुषारला सातारा याठिकाणी घेऊन जायचे आहे, असे सांगत रुग्णवाहिकेत बसवत असताना रुग्णालयातील गणेश नामक कर्मचाऱ्याने पोळला कसले तरी सोबत इंजेक्शन दिले होते. या प्रकरणात संतोष पोळ याच्यासह डॉक्टरांंचीही भूमिका संशयास्पद असून, याप्रकरणी पोलिसांनी कसून चौकशी करावी.- नंदा जाधव, मृत तुषारची आई