मराठा आरक्षणाला पाठिंबाच, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट केली भूमिका
By सचिन काकडे | Updated: January 19, 2024 17:27 IST2024-01-19T17:25:54+5:302024-01-19T17:27:36+5:30
सातारा : मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात रान उठवलं. आरक्षणाच्या मागणीला मराठा समाज म्हणून आमचा निश्चितच पाठिंबा आहे. ...

मराठा आरक्षणाला पाठिंबाच, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट केली भूमिका
सातारा : मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात रान उठवलं. आरक्षणाच्या मागणीला मराठा समाज म्हणून आमचा निश्चितच पाठिंबा आहे. भारतीय जनता पार्टी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आरक्षण देण्याबाबत प्रामाणिक प्रयत्न करत असून, शासन लवकरच योग्य तो तोडगा काढेल, असा विश्वास आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कास योजनेच्या नूतन जलवाहिनीच्या कामाचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी सोलापूर येथून ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्यात आले. सातारा पालिकेच्या सभागृहात या सोहळ्याच्या थेट प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात आली होती. हा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
ते म्हणाले, मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी रान उठवलं, पेटवलं ही वस्तुस्थिती आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी त्यांनी आंदोलनाची भूमिका स्वीकारली आहे. मराठा समाज म्हणून आमचा त्यांच्या लढ्याला पाठिंबाच आहे. परंतु त्यांना फार काळ आंदोलन करावे लागणार नाही. राज्य सरकार निश्चितच आरक्षण प्रश्र्नी योग्य तो तोडगा काढेल.