शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा; एआयएडीएमकेमध्ये फूट
2
Top Marathi News Live: 'नीट' पेपरफुटीच्या मुद्द्यावरून ABVPचे दिल्लीच्या NTE कार्यालयाबाहेर आंदोलन
3
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
4
तमिळनाडू सरकारचा २४ तासात मोठा 'यू-टर्न'; ज्योतिषी रिकी पंडित यांची 'OSD' पदावरून उचलबांगडी
5
Mumbai: डोक्यावर हात ठेवून आजार बरे करणाऱ्या चौघांना बेड्या; घरात देवाच्या मूर्ती, प्रतिमा पूजेला विरोध केल्याचा आरोप
6
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
7
Loan Rates Hike: 'या' सरकारी बँकेनं वाढवले व्याजदर, आता Home Loan आणि Car Loan चे EMI होऊ शकतात महाग
8
पॅट कमिन्सला BCCIचा मोठा दणका! हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यरसह 'नकोशा' यादीत मिळालं स्थान
9
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल 'भाजपा'मधून लढणार; रोहित पवारांचा मोठा दावा
10
इराणची नाकेबंदी युक्रेन तोडणार! अमेरिकेच्या हाती लागलं 'ब्रह्मास्त्र'; होर्मुजमध्ये आता रक्ताचा खेळ?
11
'मला पर्याय शोधून दाखवाच!', भरमिटिंगमध्ये अपमान केल्याने तरुणीचा तडकाफडकी राजीनामा; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
12
सायको किलर! २५ तासांत ३ हत्या करणाऱ्या गुरप्रीतच्या बॅगेत होतं ७ मृत्यूंचं गुपित
13
‘सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद’च्या अफवा खोट्या; एअर इंडियाने दिले स्पष्टीकरण, पण...
14
Shocking: खळबळजनक! लिंबू तोडल्याच्या रागातून १२ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या; १२ जणांना अटक
15
एलिफंटा ते नाणेघाट : प्राचीन व्यापाराचा ‘कॉरिडॉर’ उजेडात; पुरातत्व विभागाचे उत्खनन, व्यापारावर शिक्कामोर्तब
16
होर्मुझ'मधून गॅस पुरवठा ठप्प, भारताचा 'प्लॅन बी' तयार! पाहा कशी केली जाते भरपाई
17
शिंदेसेनेच्या ९ नगरसेवकांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; प्रकरण काय आहे?
18
Art Of Living: तुम्हाला माहीत आहे का? श्री श्री रवीशंकर त्यांच्या नावात दोनदा 'श्री' का लावतात?
19
IPL 2026: "पहिल्या चेंडूपासूनच..." RCB विरुद्धच्या सामन्याआधी शेन वॉटसनचा KKR च्या खेळाडूंना कानमंत्र!
20
NEET Exam Paper Leak : NEET पेपर लीकमध्ये मोठा खुलासा! २ भावांनी डॉक्टरकडून ३० लाखांत खरेदी केला पेपर अन्...
Daily Top 2Weekly Top 5

माउलींच्या पदस्पर्शानं सुखावली लोणंदनगरी

By admin | Updated: July 6, 2016 00:28 IST

लाखोंची हजेरी : सहस्त्र जलधारांनी वरुणराजाकडून स्वागत

लोणंद :
सावळे सुंदर रूप मनोहर।
राहो निरंतर हृदयीं माझे।।
आणिक काहीं इच्छा नाहीं आम्हा चाड।
तुझें नाम गोड पांडुरंगा।।
टाळ-मृदंगाच्या तालावर विठूनामाचा गजर करीत मंगळवारी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा जिल्ह्यात दाखल झाला. नीरा नदीत पादुकांना स्नान घातल्यानंतर नीरा ते लोणंद पायी वारीने पालखी सोहळा लोणंदनगरीत विसावला अन् माउलींच्या पदस्पर्शानं अवघी लोणंदनगरी सुखावून गेली. वरुणराजानेही सहस्यजलधारांनी माउलींचे स्वागत केले.
पालखी सोहळा जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर लोणंदमध्ये नगरपंचायतीसमोर आला. त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य आनंदराव शेळके-पाटील, नगराध्यक्षा स्नेहलता शेळके-पाटील, उपनगराध्यक्ष लक्ष्मण शेळके, मुख्याधिकारी धैर्यशील जाधव, नगरसेवक हणमंत शेळके, सचिन शेळके, हेमलता कर्णवीर, राजेंद्र डोईफोडे, कृष्णाबाई रासकर, कुसूम शिरतोडे, दशरथ जाधव, योगेश क्षीरसागर, दिपाली क्षीरसागर, गजेंद्र मुसळे, हर्षवर्धन शेळके, तारीख बागवान, सर्फराज बागवान उपस्थित होते.
गावातील प्रमुख मार्गावरून पालखी तळावर नेण्यात आली. यावेळी लोणंदकरांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सायंकाळी साडेपाचला पालखी तळावर पोहोचली.
दिंड्यांतील सर्व वारकऱ्यांनी गोलाकार करुन त्यामध्ये पालखी नाचवत हरिनामाचा गजर केला. त्यानंतर चोपदारांनी राजदंड उंचावताच सर्व शांत झाले. यावेळी दिंडीप्रमुख व दिंड्यांना सूचना करण्यात आल्या. भजन, कीर्तन आणि भारुडामध्ये लोणंदनगरी दंग झाली होती. (वार्ताहर)