छेडछाडीला कंटाळून युवतीची आत्महत्या, युवक ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 11:34 IST2019-10-03T11:33:06+5:302019-10-03T11:34:15+5:30

वारंवार होत असलेल्या छेडछाडीच्या प्रकाराला कंटाळून युवतीने आत्महत्या केल्याची घटना सातारा तालुक्यातील सोनगाव सं. निंब या गावात मंगळवारी रात्री आठ वाजता घडली. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित युवकाला ताब्यात घेतले आहे.

Suicide of young woman molested by molestation | छेडछाडीला कंटाळून युवतीची आत्महत्या, युवक ताब्यात

छेडछाडीला कंटाळून युवतीची आत्महत्या, युवक ताब्यात

ठळक मुद्देछेडछाडीला कंटाळून युवतीची आत्महत्यायुवक ताब्यात : लग्नासाठी वारंवार तगादा

सातारा : वारंवार होत असलेल्या छेडछाडीच्या प्रकाराला कंटाळून युवतीने आत्महत्या केल्याची घटना सातारा तालुक्यातील सोनगाव सं. निंब या गावात मंगळवारी रात्री आठ वाजता घडली. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित युवकाला ताब्यात घेतले आहे.

अल्पेश भीमराव सावंत (रा. सोनगाव सं. निंब, ता. सातारा) असे ताब्यात घेतलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबात पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रणाली शिंदे (वय १९) हिची इच्छा नसताना अल्पेश सावंत हा ह्यतू माझ्याशी लग्न कर,ह्ण असे म्हणून वारंवार तगादा लावून मानसिक त्रास देत होता.

लग्न केले नाही तर बदनामी करण्याची व जीवे मारण्याची धमकीही तो देत होता. या त्रासाला कंटाळून प्रणालीने मंगळवारी रात्री राहत्या घरात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेनंतर तिच्या वडिलांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन अल्पेश सावंत याच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

Web Title: Suicide of young woman molested by molestation