साताऱ्यात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 21:53 IST2019-05-10T21:53:10+5:302019-05-10T21:53:39+5:30
येथील केसरकर पेठेतील विजय सुनिल बोताळे (वय २५) या युवकाने शुक्रवारी दुपारी चार वाजता राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. विजय हा साताºयातील एका दुकानात काम करत होता. गेल्या काही दिवसांपासून तो तणावाखाली होता.

साताऱ्यात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
सातारा : येथील केसरकर पेठेतील विजय सुनिल बोताळे (वय २५) या युवकाने शुक्रवारी दुपारी चार वाजता राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. विजय हा साताºयातील एका दुकानात काम करत होता. गेल्या काही दिवसांपासून तो तणावाखाली होता. शुक्रवारी दुपारी घरातील सर्वजण बाहेर गेले होते. त्यावेळी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याची आई घरी आल्यानंतर विजयचा मृतदेह लटकताना त्यांना दिसला. मुलाचा मृतदेह पाहून आईने आक्रोश सुरू केला. त्यांच्या आवाजाने आजूबाजूचे रहिवाशांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. त्यानंतर काहींनी शहर पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन विजयचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.
विजयने नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली, हे अद्याप पोलिसांना समजले नाही. शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद झाली नव्हती.