दारूच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या, साताऱ्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 15:48 IST2022-03-30T15:46:44+5:302022-03-30T15:48:38+5:30
सातारा : दारूच्या नशेत एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. औंध, ता. खटाव येथे काल, मंगळवारी (दि. २९) ...

दारूच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या, साताऱ्यातील घटना
सातारा : दारूच्या नशेत एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. औंध, ता. खटाव येथे काल, मंगळवारी (दि. २९) सायंकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. राजेंद्र आनंदा रणदिवे (वय ५२, रा. औंध, ता. खटाव) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीची नावे आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आनंदा रणदिवे यांनी राहत्या घरात लोखंडी अँगलला दारूच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार घरातल्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी औंध पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला. या घटनेची औंध पोलीस ठाण्यात नोंद झाली असून, हवालदार सी. बी. पाटील हे अधिक तपास करीत आहेत.