ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर आगीत खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:39 IST2021-04-07T04:39:39+5:302021-04-07T04:39:39+5:30

कऱ्हाड : बेलवडे हवेली, ता. कऱ्हाड गावच्या हद्दीत महामार्गावर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने अचानक पेट घेतला. या आगीत ऊसासह ...

Sugarcane tractor on fire | ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर आगीत खाक

ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर आगीत खाक

कऱ्हाड : बेलवडे हवेली, ता. कऱ्हाड गावच्या हद्दीत महामार्गावर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने अचानक पेट घेतला. या आगीत ऊसासह ट्रॅक्टरचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

दरम्यान, कऱ्हाड पालिकेच्या अग्निशामक दलाची गाडी वेळेत आल्याने आग आटोक्यात आली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॅक्टर (क्र. एमएच २३ टी ४९९५) हा पुणे - बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरुन भरलेल्या उसासह चालक हरिचंद्र काशीद (रा. बीड) जयवंत शुगर कारखान्याकडे ऊस गळीत करण्यासाठी निघाला होता. हा ट्रॅक्टर सहा वाजण्याच्या सुमारास बेलवडे हवेली गावच्या हद्दीत आला असता या ट्रॅक्टरने अचानक पेट घेतला. पाहता पाहता या आगीने रौद्ररुप धारण केल्याने आगीत उसासह ट्रॅक्टरचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

कऱ्हाड पालिकेच्या अग्निशामक दलाची गाडी वेळेत आल्याने आग आटोक्यात आली. मात्र, या आगीत ट्रॅक्टर जळून खाक झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेने महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

फोटो : ०५केआरडी०३

कॅप्शन : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर बेलवडे हवेली, ता. कऱ्हाड येथे अचानक लागलेल्या आगीत ट्रॅक्टर जळून खाक झाला.

Web Title: Sugarcane tractor on fire