शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Satara: उसाच्या शेतात विद्युत तार पडल्याने ऊसतोड मजूर ठार, तीन एकरातील ऊस जळाला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 16:08 IST

पाच बैलजोड्यांसह २५ जण बचावले

कोळकी : विडणी येथील २६ फाटा दहाबिघे येथे उसाच्या शेतात २२ किलो वॅट मुख्य विद्युत तार तुटून पडल्याने ऊसतोड मजूर जागीच ठार झाला. शाॅर्टसर्किटने उसाच्या शेताने पेट घेतल्याने तीन एकरातील ऊस जळाला. उसाच्या फडातील ऊसतोड कामगार वाहने वेळीच शेतातून बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. सुभाष ऊखा गायकवाड (वय ४५) असे मृत्यू झालेल्या ऊसतोड मजुराचे नाव आहे. ही घटना बुधवारी (दि.२९) घडली.दहाबिघे २६ फाटा येथे फलटण येथील खंडू शेंडे यांच्या शेतात खासगी कारखान्याकडून ऊसतोड सुरू आहे. मजूर सुभाष ऊखा गायकवाड (वय ४५, रा. आंबा, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) यांच्या अंगावर २२ केव्हीची मेन लाईनची तार अचानक तुटून अंगावर पडली. यामध्येच ऊसतोड मजुराचा जागीच मृत्यू झाला.शॉर्टसर्किटने उसाच्या पाचटीमुळे पेट घेतल्यावर काही क्षणातच आगीने रौद्ररुप धारण करुन तीन एकरातील ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. मुख्य विद्युत वाहिनी तुटून उसाच्या क्षेत्राने पेट घेऊन ऊसतोड मजुराचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती महावितरण अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर तातडीने विद्युत पुरवठा बंद करण्यात आला.घटनास्थळी महावितरणचे अधिकारी, फलटण ग्रामीणचे अधिकारी यांनी भेट देऊन पाहणी केली. फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केले असून, महावितरणकडून तातडीची वीस हजार मदत करण्यात आली आहे. बाकीची नुकसान भरपाई लवकरच दिली जाईल, असे महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रदीप ग्रामोपाध्ये यांनी सांगितले. फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात बाबुलाल पवार यांनी फिर्याद दिली आहे.अनर्थ टळलाया उसाच्या शेतात ऊसतोड करणारे महिला, पुरुष, लहान मुले असे जवळपास वीस ते पंचवीस मजूर होते. तसेच पाच बैलजोड्या होत्या. बैलगाडी, उसाचे ट्राॅलीट्रॅक्टर उभे होते. २२ केव्हीची मेन लाईन उसाच्या शेतात पडल्याने शाॅर्टसर्किटने उसाच्या शेतात पाचटीने पेट घेतला. घटनेचे गांभीर्य ओळखून ऊसतोड मालक नितीन नारायण पवार यांनी सर्व ऊसतोड मजूर, बैलगाडी, बैल, ट्रॅक्टर बाहेर सुरक्षित स्थळी काढल्याने मोठी जीवितहानी वाचली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरsugarcaneऊसelectricityवीजDeathमृत्यू