शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:33 IST

कुडाळ : जावळी तालुक्यातील शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून शेतीपंपासाठी नियमित वीज पुरवठा व्हावा, यासाठी झगडत होते. याबाबत महिन्यापूर्वी शेतकरी ...

कुडाळ : जावळी तालुक्यातील शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून शेतीपंपासाठी नियमित वीज पुरवठा व्हावा, यासाठी झगडत होते. याबाबत महिन्यापूर्वी शेतकरी संघटनेचे कुडाळ या ठिकाणी आंदोलन झाले होते. यामुळेच वीज वितरण कंपनीने शेतीपंपासाठी वीज पुरवठा सुरळीत केला असून, आपल्या प्रयत्नांना यश मिळाले आहे, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे पश्चिम विभाग प्रमुख कमलाकर भोसले यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, जावळी तालुक्यांमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून शेती पंपांना अनियमित विजेचा पुरवठा होत होता. त्यामुळे भागातील शेतकरी पुरता वैतागून गेला होता. शेतीपंपाला दिल्या जाणाऱ्या वीज पुरवठ्याच्या वेळेमध्येही दोन तासांची विजेची कपात कपात होत होती. याबाबत अनेकदा शेतकऱ्यांनी तक्रारी करूनही वीज वितरण मंडळाकडून दुर्लक्ष केले जात होते. याबाबत शेतकरी संघटनेने कुडाळ या ठिकाणी आंदोलनही छेडले होते. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाची तत्काळ दखल घेऊन वीज मंडळाचे उपकार्यकरी अभियंता सचिन बनकर यांनी पाठपुरावा केला आणि शेतीपंपासाठी वीज पुरवठा सुरळीत करण्यात यश मिळविले आहे.

याबद्दल शेतकरी संघटनेच्यावतीने वीज मंडळाचे अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक करण्यात आले आहे. तसेच नवीन कृषी धोरणात देण्यात आलेल्या वीज बिल सावलीचा फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांनी वीजबिल भरणा करावा आणि महावितरणला सहकार्य करावे, अशी विनंती केली आहे.

(कोट)

जावळी तालुक्यातील शेतकऱ्यांना यापुढे वीज पंपासाठी होणारे लोडशेडिंग होणार नसून, सुरळीत वीज पुरवठा होईल. एजीचा येणारा लोड हा १० एमच्या ट्रान्सफार्मवर घेतलेला आहे. यामुळे शेतीपंपासाठीचा वीज पुरवठा खंडित होणार नाही. वीज मंडळाचे सर्व कर्मचाऱ्यांनी यासाठी प्रयत्न केले आहेत. शेतपंपाला नियमित वीज पुरवठा होण्याकरिता एक पाऊल उचलले असून, लवकरच कायमस्वरूपी उपाययोजना होईल. याकरिता वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरू आहे.

- सचिन बनकर, उपकार्यकरी अभियंता, जावळी