शहरं
Join us  
Trending Stories
1
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
2
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
3
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
4
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
5
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
6
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
7
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
8
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
9
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
10
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
11
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
12
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
13
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
14
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
15
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
16
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
17
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
18
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
19
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
20
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी जमविले ३० हजार--भारतमाता मंडळाकडूनही बोलेंना मदत

By admin | Updated: September 17, 2014 22:28 IST

दुर्गोत्सव साधेपणाने : पत्नी आणि चार मुली अशा त्यांच्या परिवाराला आधार देण्यासाठी ‘लोकमत’ने मदतीचे आवाहन केल्यावर निधीचा ओघ सुरू

सातारा : यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट आॅफ सायन्सच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी बोले कुटुंबीयांसाठी तब्बल तीस हजार रुपयांची मदत गोळा करून आदर्श निर्माण केला आहे. दरम्यान, सदर बझार येथील भारतमाता मंडळाने दुर्गोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेऊन बोले कुटुंबीयांना आर्थिक मदत दिली. अनंत चतुर्दशीच्या रात्री भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत चंद्रकांत बोले यांना प्राण गमवावे लागले होते. पत्नी आणि चार मुली अशा त्यांच्या परिवाराला आधार देण्यासाठी ‘लोकमत’ने मदतीचे आवाहन केल्यावर निधीचा ओघ सुरू झाला. बोले यांच्या मुली त्यांची वडापावची गाडी पुन्हा सुरू करण्याची जिद्द बाळगून आहेत. त्यांना उभारी देण्यासाठी सायन्स कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला. कॉलेजमध्ये लाकडी पेटी तयार करून त्यांनी सर्वांकडून मदत गोळा केली. विद्यार्थ्यांबरोबरच, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने या अभियानात सहभाग नोंदविला आणि तब्बल तीस हजार रुपये जमा झाले. ही रक्कम बुधवारी बोले कुटुंबीयांना देण्यात आली. सदर बझार येथील भारतमाता मंडळ नेहमी सामाजिक बांधिलकीचे भान राखून उत्सव साजरा करीत असते. या मंडळाने डॉल्बीसारख्या गोष्टींना कधीच थारा दिला नाही. मंडळाचे अध्यक्ष प्रदीप ससे यांच्यासह विकास धुमाळ, धनेश भोसले, सुजित जाधव, सुनील भुतकर, राजेंद्र रजपूत, अमय भुतकर, नितीन संकपाळ आदींनी यंदा दुर्गोत्सव साधेपणाने आणि काटकसरीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि बोले कुटुंबीयांना बुधवारी मदतीची रक्कम सुपूर्द केली. याखेरीज आयुर्विमा महामंडळाच्या प्रशिक्षण केंद्रातील कर्मचाऱ्यांनीही बुधवारी मदत दिली. विविध संस्था, संघटनांनी याकामी निधीचे संकलन सुरू केले आहे. (प्रतिनिधी)