शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

विद्यार्थ्यांची कोंडी : शुल्क वसुलीसाठी खासगी शाळांचा छुपा अजेंडा..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 11:14 IST

बेताची आर्थिक स्थिती असलेले पालक तीन महिन्यांची फी एकत्र भरण्याचा पर्याय निवडतात. सध्या नोकरीच्या ठिकाणी पगारांमध्ये झालेली कपात लक्षात घेता पालकांना ही फी भरणं शक्य नाही.

ठळक मुद्देआॅनलाईन वर्गात फी भरणाऱ्यांनाच मिळतोय प्रवेश

सातारा : राज्याच्या शालेय शिक्षण मंत्र्यांसह स्थानिक प्रशासनानेही खासगी शिक्षण संस्थांनी पालकांना फीची सक्ती न करण्याचे आदेश दिले होते. असे असतानाही अनेक शाळांत फी न भरलेल्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात घेतलेच नाही. उलट शुल्क वसुलीसाठी खासगी शाळांनी सुरू केलेल्या या छुप्या अजेंड्यामुळे पालक  मात्र, चांगलेच त्रस्त झाले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांची परीक्षा न घेताच मे महिन्यात सर्वांना उत्तीर्ण करून पुढच्या वर्गात ढकलण्यात आले. परिणामी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याचा आणि पालकांनी फी भरण्याचा काही प्रश्नच उद्भवला नाही. बहुतांश पालक वर्षाची फी दोन टप्प्यांमध्ये भरण्याला प्राधान्य देतात. शाळा सुरू झाल्यानंतर आणि दिवाळीच्या सुट्टीनंतर फी भरण्यात येते. मात्र, बेताची आर्थिक स्थिती असलेले पालक तीन महिन्यांची फी एकत्र भरण्याचा पर्याय निवडतात. सध्या नोकरीच्या ठिकाणी पगारांमध्ये झालेली कपात लक्षात घेता पालकांना ही फी भरणं शक्य नाही.

सध्या नववीच्या वर्गातून दहावीत गेलेल्या विद्यार्थ्यांचे आॅनलाईन वर्ग सुरू झाले आहेत. यासाठी अनेक शाळांनी दहावीच्या विद्यार्थ्यांचा तुकडी निहाय व्हॉटसअ‍ॅप ग्रुप सुरू केला आहे. नियमितमपणे या ग्रुपवर अध्यापनाबरोबरच गृहपाठही दिला जातो. विशेष म्हणजे ज्या विद्यार्थ्याची पूर्ण फी भरली आहे, त्यांनाच या ग्रुपमध्ये घेण्यात आले आहे. फी पूर्ण न भरल्याने तुमच्या पाल्याचा प्रवेश निश्चित केला नाही, असं कारण सांगून खासगी शाळांनी वसुलीच्या नावाखाली विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान करण्याचेच धोरण अवलंबले आहे.

मुठभर शाळांनी राबविलेल्या या धोरणामुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्रात गढूळ वातावरण होऊ लागलं आहे. कोणत्याही पालकाला खिशात पैसे असताना आपल्या मुलांचं शैक्षणिक नुकसान करून काहीच मिळणार नाही, याची जाणीव शाळा प्रशासनाने ठेवण्याची गरज आहे, अशी अपेक्षा पालकांतून व्यक्त होऊ लागलीय. तर कोरोनाच्या संकटात आपल्या पाल्याला शिक्षण देणारी संस्थाही आर्थिक अडचणीत सापडू नये, यासाठी पालकांचाही पाठिंबा शाळेला आवश्यक आहे.मुलं शाळेतच नाहीत तर फी कशाची भरायची ?

मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोनाच्या भितीने पालकांनी मुलांना शाळेतच पाठविले नाही. त्यानंतर २३ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे सर्व शाळा बंदच ठेवण्यात आल्या. लॉकडाऊन वाढला आणि विद्यार्थ्यांच्या शाळेत जाण्याच्या आशा संपूर्णपणे मावळल्या. परीक्षा रद्दच्या निर्णयानंतर विद्यार्थ्यांनी शाळेत जाण्याचा प्रश्नच नाही. मुलं शाळेत गेलीच नाहीत तर फी कशाची भरायची असा सवाल पालक करतायत.

शाळा बंद तरीही शिक्षकांचे पगार सुरूच..!मार्च महिन्यापासून विद्यार्थी शाळेत आले नाहीत, पण विद्यार्थ्यांसाठी आॅनलाईन आणि व्हॉटसअ‍ॅपवरून अभ्यास दिला जात होता. मुलं शाळेत नसलीतरीही शासन आदेशानुसार शिक्षक नियमितपणे आॅनलाईन अध्यापनाचे काम करत होते. ज्याप्रकारे फीची सक्ती नको, असे शासन सांगत होते. तसेच कोणाच्याही पगारात कपात नको, असंही शासनाने कळवलंय. शिक्षक व  शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पगार नियमित सुरू असल्याचे शाळांचे म्हणणे आहे.

 

शासनाच्या आदेशानुसार कोरोनाच्या या काळात फीमध्ये वाढ तसेच सक्तीने वसुली करु नये अशी सूचना शाळांना यापूर्वी लेखी पत्राद्वारे केली आहे. मुख्याध्यापकांबरोबर झालेल्या आॅनलाईन बैठकीतही याविषयी सांगण्यात आले आहे. तरीही असा काही प्रकार घडत असेल तर गैर आहे. याबाबत संबंधित पालकांनी खासगीत लेखी तक्रार केली तर संबंधित शाळांवर कारवाई करण्यात येईल.- राजेश क्षीरसागरमाध्यमिक शिक्षणाधिकारी 

टॅग्स :SchoolशाळाonlineऑनलाइनMONEYपैसाStudentविद्यार्थी