शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

जीवनाच्या संघर्षात विषाचा प्याला ठरतोय मोहरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:38 IST

सातारा: द्रारिद्र्य, बेरोजगारी आणि कौटुंबिक कलहातून अनेकजण टोकाचे पाऊल उचलत असून, जीवनाच्या संघर्षात विषाचा प्यालाच मोहरा ठरत असल्याचे ...

सातारा: द्रारिद्र्य, बेरोजगारी आणि कौटुंबिक कलहातून अनेकजण टोकाचे पाऊल उचलत असून, जीवनाच्या संघर्षात विषाचा प्यालाच मोहरा ठरत असल्याचे अलीकडे पाहायला मिळते. जिल्ह्यात एका आठवड्यात तब्बल १८ जणांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. यावरूनच आयुष्य किती स्वस्त झालेय, याची प्रचीती येते. कोरोनाच्या शिरकावानंतर तर सर्वांच्याच आयुष्यात बदल झाला आहे. हे बदल कोणी सहन करतंय तर कोणाला सहन करता येइना. त्यामुळे अशा लोकांना आता विषाचा प्यालाच जवळचा वाटतोय.

कोरोनाने रोजगार हिरावल्याने अनेकजण बेरोजगार झाले. परिणामी, आर्थिक चणचण ही कौटुंबिक कलहाचे कारण ठरू लागले आहे. हे कलह आता एकमेकांचे जीव न घेता स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. मानसिक संतुलन ढासळत असल्याने अगदी छोट्यातल्या छोट्या कारणातूही अनेकजण टोकाचे पाऊल उचलत आहेत. हे प्रमाण वर्षभरापूर्वीपेक्षा वाढल्याचे पोलिसांच्या नोंदवहीतील आकडेवारीवरून दिसून येत आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात गत आठवड्यात तब्बल १८ जणांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये बहुतांश कारणे ही दारूच्या नशेत असली तरी बेरोजगारी आणि आर्थिक चणचण हे एक मुख्य कारण असल्याचे पोलिसांच्या डायरीमध्ये नोंद करण्यात आले आहे.

साताऱ्यातील करंजेपेठेतील शुभम भंडारे या २३ वर्षाच्या युवकाने दारूच्या नशेत स्वतःचा गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न केला. हा युवकही बेरोजगार आहे. त्याचबरोबर मयूर दशरथ मोरे (वय २२, रा. कारी, ता. सातारा) या युवकानेही दारूच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्‍न केला आहे. तिसरी घटना कोरेगाव तालुक्यात घडली. अशोक नामदेव गवळे (वय ५५) यांनीही राहत्या घरी दारूच्या नशेत विषारी औषध प्राशन केले. तसेच जावळी तालुक्यातील सर्जापूर येथील संजय नारायण मोहिते (वय ३५) या युवकाने विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. आत्महत्या करण्याचे आणखी एक कारण समोर आले ते म्हणजे, आजारपण. विशेषता वयोवृद्धांचे अंथरुणाला खिळलेले आजारपण. त्यांना सहन होत नाही, अशा कारणातूनही अनेक जण हा टोकाचा निर्णय घेत असल्याचे पाहायला मिळते. सातारा तालुक्यातील अरे या गावातील अंकुश रामजी महाडिक या ८० वर्षीय वृद्धाने विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्‍न केला आहे. कोरेगाव तालुक्यातील वाघोली येथील अमर गायकवाड (वय ४०) यांनीही घरगुती कारणातून विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्‍न केला तर खेड (ता.सातारा) येथील गणेश शिंदे (वय ३८) यांनीही राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्‍न केला होता. त्यांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अशाप्रकारे इतरांनीही असाच आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. यातील काही जणांची कौटुंबिक तर काही जणांची बेरोजगारी त्यांना टोकाचे पाऊल उचलण्यात कारणीभूत ठरली आहे. रुग्णालयात अशा व्यक्तींना आणल्यानंतर नातेवाईकांकडून मूळ कारणांना बगल दिली जाते. त्यातील पहिले कारण आपली इज्जत जाईल तर दुसरे कारण आपल्या अंगलट येईल. फार तर अशा प्रकरणांमध्ये कोणाची तक्रार असेल तरच पोलीस यामध्ये डोकावून पाहतात. अन्यथा तक्रार नसेल तर केवळ जुजबी नोंद करून फाईल कायमची बंद करतात.

चौकटः राग करतोय राखरांगोळी

ताणतणाव, आर्थिक टंचाई, बेरोजगारी यामुळे अनेकांचे मानसिक संतुलन ढासळत चालले आहे. परिणामी कौटुंबिक कलह वाढताहेत. यातून रागामुळे आयुष्याची राखरांगोळी होते. पोलीसदप्तरी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांचे राग हे एक प्रमुख कारण असल्याचे समोर येत आहे.