शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
2
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
3
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
4
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
5
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
6
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
7
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
8
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
9
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
10
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
11
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
12
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
13
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
14
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
15
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
16
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
17
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
18
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
19
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
20
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात

साताऱ्यात पूर्वीच्या भांडणाच्या कारणातून व्यावसायिकाला दांडक्याने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 5:31 PM

पूर्वीच्या भांडणाच्या कारणातून येथील मंगळवार पेठेत बुधवारी रात्रीच्या सुमारास चिकन व्यावसायिकासह तिघांना शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात टॅक्सी गल्लीतील सुमारे ३० जणांवर गुन्हा नोंद झाला आहे. यामध्ये वाहनांची तोडफोड करण्याात आली आहे.

ठळक मुद्देमंगळवार पेठेत वाहनांची तोडफोड शाहूपुरी पोलिस ठाण्यात ३० जणांवर गुन्हा दाखलकार, दुचाकींचे नुकसान

सातारा ,दि. ०२ : पूर्वीच्या भांडणाच्या कारणातून येथील मंगळवार पेठेत बुधवारी रात्रीच्या सुमारास चिकन व्यावसायिकासह तिघांना शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात टॅक्सी गल्लीतील सुमारे ३० जणांवर गुन्हा नोंद झाला आहे. यामध्ये वाहनांची तोडफोड करण्याात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, येथील मंगळवार पेठेतील दस्तगीर कॉलनीत अय्याज निजाम खाटीक (वय ४९) हे चिकन व्यावसायिक राहतात. सुमारे दोन वर्षांपूर्वी बकऱ्यांची झुंज लावण्याच्या कारणावरून त्यांचा मुलगा शहादाब व टॅक्सी गल्ली (सातारा) येथील काहीजणांशी भांडणे झाली होती. त्यावेळी ही भांडणे आपापसात मिटविली होती.

दि. ३१ आॅक्टोबर रोजी शहादाब खाटीक पालिकेसमोर गेला होता. त्यावेळी जुन्या भांडणाचा राग मनात धरून त्याला शिवीगाळ व दमदाटी झाली होती. तर बुधवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास अनेकजण हातात लाकडी दांडके घेऊन खाटीक यांच्या घरी आले.

त्यावेळी तुम्ही का आलाय? असे विचारल्यावरून वादावादी झाली. यामध्येच अय्याज खाटीक यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांची पत्नी आणि मुलगा भांडणे सोडविण्यास आल्यावर त्यांनाही लाकडी दांडक्याने मारहाण करून दुखापत करण्यात आली.

याप्रकरणी सलमान शेख, स्वालीम, बबलू, आफताब, आकीब, मुस्तफा, वाहीद, आलीम रुस्तम शेख, इजाज, सुफियान इम्तियाज शेख, समीर शब्बीर शेख यांच्यासह इतर अनोळखी १५ ते २० जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस तपास करीत आहेत.कार, दुचाकींचे नुकसान..बुधवारी रात्रीच्या सुमारास हा हल्ला झाला. यावेळी हल्लेखोरांनी घराजवळ असणाऱ्या कार, रिक्षा आणि सात ते आठ दुचाकींची लाकडी दांडक्याने मोडतोड केली. यामध्ये सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :crimeगुन्हेPoliceपोलिस