Satara: धनगरवाडी ग्रामपंचायतीवर दगडफेक, तिघांविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 19:26 IST2023-11-16T19:26:10+5:302023-11-16T19:26:26+5:30
मुराद पटेल शिरवळ: खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी ग्रामपंचायतच्या इमारतीवर दगडफेक करीत साहित्यांचे नासधुस केल्याप्रकरणी संशयित तिघा विरोधात शिरवळ पोलीस ठाण्यात ...

Satara: धनगरवाडी ग्रामपंचायतीवर दगडफेक, तिघांविरोधात गुन्हा दाखल
मुराद पटेल
शिरवळ: खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी ग्रामपंचायतच्या इमारतीवर दगडफेक करीत साहित्यांचे नासधुस केल्याप्रकरणी संशयित तिघा विरोधात शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शंकर विलास शिवतरे, प्रविण रामचंद्र शिवतरे, सचिन ज्योतीबा शिवतरे अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली.
याबाबत माहिती अशी की, सुशोभिकरणाअंतर्गत धनगरवाडी ग्रामपंचायतीमार्फत आय लव्ह धनगरवाडी हा इलेक्ट्रिक फलक लावण्यात आला आहे. दरम्यान, शंकर शिवतरे, प्रविण शिवतरे, सचिन शिवतरे या तिघांनी काही कारण नसताना ग्रामपंचायत इमारतीवर दगडफेक करीत आय लव्ह धनगरवाडी लिहिलेल्या नामफलकाची तोडफोड केली. यात सुमारे चार लाखांचे नुकसान झाले. सरपंच यमुना शिवतरे यांनी याबाबत शिरवळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
याप्रकरणी शंकर शिवतरे, प्रविण शिवतरे, सचिन शिवतरे या तिघांविरोधात सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम 1984 सह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पोलीस उपनिरीक्षक अब्दुलहादी बिद्री अधिक तपास करीत आहे.