शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

राज्य कबड्डी असोसिएशनच्या निवडणुकीला ६ ऑगस्टपर्यंत स्थगिती; २१ जुलैला होती निवडणूक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2024 13:26 IST

प्रक्रियेविरुद्ध उच्च न्यायालयात सातारा हौशी कबड्डी संघटनेने दाखल केली होती याचिका

कऱ्हाड : महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेची येत्या २१ जुलै रोजी चौवार्षिक निवडणूक होणार होती. मात्र, कार्यकारी समितीची वयोमर्यादा, कार्यकाल मर्यादा तसेच मतदानाच्या हक्काबाबत राष्ट्रीय क्रीडा संहितेत असलेले नियम पायदळी तुडवत होणाऱ्या या निवडणुकीला तात्काळ स्थगिती दिली जावी म्हणून सातारा जिल्हा हौशी कबड्डी असोसिएशनच्या प्रा. अशोक चव्हाण व राष्ट्रीय खेळाडू फिरोज पठाण यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.या याचिकेबाबत उच्च न्यायालयात गुरुवार व शुक्रवारी तातडीची सुनावणी झाली. त्यात ६ ऑगस्टपर्यंत त्याला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. राज्य कबड्डी असोसिएशनला ६ ऑगस्टला त्यांचे मत मांडायला सांगितले आहे. त्यामुळे राज्य कबड्डी असोसिएशनची निवडणूक आता कायद्याच्या कचाट्यात सापडली आहे.राज्य कबड्डी संघटनेच्या निवडणुकीचा कार्यक्रम १८ जूनला जाहीर झाला. क्रीडा संहिता पायदळी तुडवली जात असल्याचा आरोप करीत अनेक संघटनांनी राज्य संघटनेशी पत्रव्यवहार करून ते थांबवण्याचा प्रयत्न केला. तसेच काही संघटनांच्या पीटीआर उताऱ्यात गोंधळ असल्याचेही समोर आले होते. काहींचे पीटीआर नामंजूर होते तर काही संघटनांमध्ये वाद असल्यामुळे त्यांच्यात कायदेशीर लढाई सुरू असूनही आपल्या जवळच्या संघटनांच्या जिल्हा प्रतिनिधींना मान्यता देण्याचे बेकायदेशीर काम राज्य संघटनेकडून करण्यात आले असल्याचे अनेकांचे मत होते.याबाबत राज्य संघटनेकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्यामुळे सातारा जिल्हा हौशी कबड्डी संघटनेने न्यायालयात धाव घेतली होती. सातारा जिल्हा हौशी कबड्डी असोसिएशनच्या वतीने ॲड. वैभव गायकवाड यांनी ही याचिका दाखल केली होती. त्याची सुनावणी होऊन निवडणुकीला ६ ऑगस्टपर्यंत स्थगिती मिळाली आहे.

प्रथम घटनादुरुस्ती मग निवडणूक प्रक्रियाक्रीडा संहितेनुसार राज्य व सर्व जिल्हा संघटनांनी प्रथम घटनादुरुस्ती करावी आणि त्यानुसार निवडणूक प्रक्रिया राबवावी, असे आदेश क्रीडा संहितेच्या संदर्भाने यापूर्वीच न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. तसेच क्रीडा संहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी हिंदुस्थानी हौशी कबड्डी महासंघाच्या (एकेएफआय) कार्यकारिणीला बरखास्त केले आहे. हे उदाहरण ताजे असतानाही राज्य संघटनेकडून क्रीडा संहितेला कागदावरच ठेवण्याचा प्रकार झाल्याचे तक्रारदारांचे मत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKabaddiकबड्डीElectionनिवडणूक 2024Courtन्यायालय