शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

Satara: पाचगणी पर्यटननगरीत रस्त्यासाठी व्यापाऱ्यांच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद, पर्यटकांची झाली गैरसोय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 14:30 IST

सुरूर-पोलादपूर मार्गाच्या कामात वेळकाढूपणाचा आरोप

महाबळेश्वर (जि.सातारा) : सुरूर-पोलादपूर मार्गाची झालेली दुरवस्था आणि या रस्त्याचे अत्यंत संथगतीने सुरू असलेल्या कामाच्या निषेधार्थ ‘आम्ही महाबळेश्वरकर’ या चळवळीने दिलेल्या महाबळेश्वर तालुका बंदच्या आवाहनास तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाबळेश्वर व पाचगणी या प्रमुख पर्यटनस्थळांसह किल्ले महाबळेश्वर, किल्ले प्रतापगड, वाडा कुंभरोशी, लिंगमळा, नाकिंदा, मेट गुताड, अवकाळी, बोंडारवाडी, भोसे, भिलार आदी गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदद्वारे नागरिकांनी रस्त्याच्या रखडलेल्या कामाबाबत तीव्र संताप व्यक्त केला.नवीन महाबळेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्यांची तसेच शिवसागर जलाशयावरील पुलांच्या कामांना वेग देण्यात येत असताना महाबळेश्वर व पाचगणीकडे येणाऱ्या सुरूर-पोलादपूर या राज्य मार्गाच्या कामाकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांत आहे. गेल्या दोन वर्षांपासून हे काम अत्यंत संथगतीने सुरू असून वारंवार मागणी करूनही शासन व प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने तालुक्यात सर्व स्तरांतून संताप व्यक्त केला जात आहे.या पार्श्वभूमीवर नागरिकांनी ‘आम्ही महाबळेश्वरकर’ ही चळवळ उभी करून पेटिट ग्रंथालयात ग्रामसभा घेतली. या ग्रामसभेत तालुक्यातील सुरू असलेल्या गलथान कारभाराचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचवेळी महाबळेश्वर शहर बंद करण्याचा ठरावही मंजूर केला होता. या प्रयत्नांना चांगला प्रतिसाद मिळत आज पाचगणी ते किल्ले प्रतापगडपर्यंत सर्व गावांनी बंद पाळत आंदोलनात सहभाग घेतला. मात्र, या बंदमुळे महाबळेश्वर व पाचगणी येथे आलेल्या पर्यटकांची काही प्रमाणात गैरसोय झाली.

आंदोलन तीव्र करण्याचा इशारासुरूर-पोलादपूर मार्गाचे काम तातडीने युद्धपातळीवर पूर्ण न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा ‘आम्ही महाबळेश्वरकर’ या चळवळीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. पुढील टप्प्यात रास्ता रोको आंदोलन, तसेच अंतिम टप्प्यात मंत्रालयासमोर काळे झेंडे व निषेध फलक घेऊन आंदोलन करण्यात येईल, असा निर्धार चळवळीचे निमंत्रक राजेश कुंभारदरे यांनी व्यक्त केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Pachgani Shutdown: Road Blockage Disrupts Tourists; Traders Protest Inaction.

Web Summary : Traders in Pachgani, Satara, protested the slow roadwork, disrupting tourism. The 'We Are Mahabaleshwarkar' movement threatens intensified action if demands aren't met.