Satara: पाचगणी पर्यटननगरीत रस्त्यासाठी व्यापाऱ्यांच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद, पर्यटकांची झाली गैरसोय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 14:30 IST2026-03-09T14:29:14+5:302026-03-09T14:30:29+5:30

सुरूर-पोलादपूर मार्गाच्या कामात वेळकाढूपणाचा आरोप

Spontaneous response to Panchgani traders strike over stalled road work | Satara: पाचगणी पर्यटननगरीत रस्त्यासाठी व्यापाऱ्यांच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद, पर्यटकांची झाली गैरसोय 

Satara: पाचगणी पर्यटननगरीत रस्त्यासाठी व्यापाऱ्यांच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद, पर्यटकांची झाली गैरसोय 

महाबळेश्वर (जि.सातारा) : सुरूर-पोलादपूर मार्गाची झालेली दुरवस्था आणि या रस्त्याचे अत्यंत संथगतीने सुरू असलेल्या कामाच्या निषेधार्थ ‘आम्ही महाबळेश्वरकर’ या चळवळीने दिलेल्या महाबळेश्वर तालुका बंदच्या आवाहनास तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाबळेश्वर व पाचगणी या प्रमुख पर्यटनस्थळांसह किल्ले महाबळेश्वर, किल्ले प्रतापगड, वाडा कुंभरोशी, लिंगमळा, नाकिंदा, मेट गुताड, अवकाळी, बोंडारवाडी, भोसे, भिलार आदी गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदद्वारे नागरिकांनी रस्त्याच्या रखडलेल्या कामाबाबत तीव्र संताप व्यक्त केला.

नवीन महाबळेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्यांची तसेच शिवसागर जलाशयावरील पुलांच्या कामांना वेग देण्यात येत असताना महाबळेश्वर व पाचगणीकडे येणाऱ्या सुरूर-पोलादपूर या राज्य मार्गाच्या कामाकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांत आहे. गेल्या दोन वर्षांपासून हे काम अत्यंत संथगतीने सुरू असून वारंवार मागणी करूनही शासन व प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने तालुक्यात सर्व स्तरांतून संताप व्यक्त केला जात आहे.

या पार्श्वभूमीवर नागरिकांनी ‘आम्ही महाबळेश्वरकर’ ही चळवळ उभी करून पेटिट ग्रंथालयात ग्रामसभा घेतली. या ग्रामसभेत तालुक्यातील सुरू असलेल्या गलथान कारभाराचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचवेळी महाबळेश्वर शहर बंद करण्याचा ठरावही मंजूर केला होता. या प्रयत्नांना चांगला प्रतिसाद मिळत आज पाचगणी ते किल्ले प्रतापगडपर्यंत सर्व गावांनी बंद पाळत आंदोलनात सहभाग घेतला. मात्र, या बंदमुळे महाबळेश्वर व पाचगणी येथे आलेल्या पर्यटकांची काही प्रमाणात गैरसोय झाली.

आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

सुरूर-पोलादपूर मार्गाचे काम तातडीने युद्धपातळीवर पूर्ण न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा ‘आम्ही महाबळेश्वरकर’ या चळवळीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. पुढील टप्प्यात रास्ता रोको आंदोलन, तसेच अंतिम टप्प्यात मंत्रालयासमोर काळे झेंडे व निषेध फलक घेऊन आंदोलन करण्यात येईल, असा निर्धार चळवळीचे निमंत्रक राजेश कुंभारदरे यांनी व्यक्त केला.

Web Title : पांचगणी बंद: सड़क जाम से पर्यटक परेशान; व्यापारियों का प्रदर्शन

Web Summary : सतारा के पांचगणी में सड़क निर्माण में देरी के खिलाफ व्यापारियों का प्रदर्शन, पर्यटन बाधित। 'हम महाबलेश्वरकर' आंदोलन ने मांगें पूरी न होने पर आंदोलन तेज करने की धमकी दी।

Web Title : Pachgani Shutdown: Road Blockage Disrupts Tourists; Traders Protest Inaction.

Web Summary : Traders in Pachgani, Satara, protested the slow roadwork, disrupting tourism. The 'We Are Mahabaleshwarkar' movement threatens intensified action if demands aren't met.