संस्कृत चित्र प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:23 IST2021-09-02T05:23:36+5:302021-09-02T05:23:36+5:30

निमित्त होते येथील शिक्षण मंडळ संचलित ‘संस्कृतिका’च्यावतीने संस्कृत दिन व कालिदास दिनाच्या सोहळ्याचे! संस्कृतिकाच्यावतीने संस्कृतदिन विविध उपक्रमांद्वारे साजरा करण्यात ...

Spontaneous response to Sanskrit painting exhibition | संस्कृत चित्र प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद

संस्कृत चित्र प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद

निमित्त होते येथील शिक्षण मंडळ संचलित ‘संस्कृतिका’च्यावतीने संस्कृत दिन व कालिदास दिनाच्या सोहळ्याचे! संस्कृतिकाच्यावतीने संस्कृतदिन विविध उपक्रमांद्वारे साजरा करण्यात आला. संस्थेच्या चारही माध्यमिक शाखांतील विद्यार्थ्यांना पंचतंत्र व हितोपदेशातील कथा संस्कृतच्या तासाला सांगितल्या. त्यामुळे मुलांची मानसिक भूक पूर्णत्वास जाताना भावनिक प्रगल्भता आकारास आली.

संस्कृतिकेच्या समन्वयक माधुरी कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन शिक्षण मंडळाचे सचिव चंद्रशेखर देशपांडे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कुलकर्णी, शिल्पा वाळिंबे, राजेंद्र लाटकर यांच्यासह सर्व शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.

कोरोना नियमांचे काटेकोर पालन करत हे प्रदर्शन दोन दिवस खुले ठेवण्यात आले होते. अनेक संस्कृतप्रेमींनी याला भेट दिली. प्रदर्शनाच्या यशस्वितेसाठी संस्कृत शिक्षिका शुभांगी सामक, पल्लवी भोसले, गौरी कुलकर्णी, प्रांजली कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले,

फोटो : ३१केआरडी०२

कॅप्शन : कऱ्हाड येथे शिक्षण मंडळाच्यावतीने आयोजित चित्रप्रदर्शनाची पाहणी करताना चंद्रशेखर देशपांडे, जी. जी. अहिरे, मुख्याध्यापिका बायस यांनी केली.

Web Title: Spontaneous response to Sanskrit painting exhibition