Satara Crime: आईचा खून केल्याप्रकरणी मुलास जन्मठेप; माझे लग्न का करत नाही याकारणावरुन डोक्यात घातले होते कुऱ्हाडीने घाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 18:23 IST2025-09-16T18:18:31+5:302025-09-16T18:23:19+5:30

वडूज : मोराळे, ता. खटाव येथील किरण शहाजी शिंदे (वय ३२) याने माझे लग्न का करत नाही या कारणावरून ...

Son sentenced to life imprisonment for mother's murder Vaduz court verdict | Satara Crime: आईचा खून केल्याप्रकरणी मुलास जन्मठेप; माझे लग्न का करत नाही याकारणावरुन डोक्यात घातले होते कुऱ्हाडीने घाव

Satara Crime: आईचा खून केल्याप्रकरणी मुलास जन्मठेप; माझे लग्न का करत नाही याकारणावरुन डोक्यात घातले होते कुऱ्हाडीने घाव

वडूज : मोराळे, ता. खटाव येथील किरण शहाजी शिंदे (वय ३२) याने माझे लग्न का करत नाही या कारणावरून आई कांताबाई शहाजी शिंदे (वय ५१) यांचा खून केल्याप्रकरणी आरोपी मुलगा किरण शिंदे याला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. एस. कोलेसो यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

या खटल्याची पार्श्वभूमी अशी, मोराळे ता. खटाव येथे गुरुवार, दि.११ डिसेंबर २०१९ रोजी रात्री साडेदहा मुलगा किरण शिंदे याने आई कांताबाई हिला म्हणाला, माझ्या मागच्या मुलांची लग्न झाली. तुम्ही माझे लग्न का करीत नाही, असे म्हणून वडील शहाजी शिंदे यांना घरातून लाथ मारून बाहेर काढले. घरास आतून कडी लावून आईला शिवीगाळ दमदाटी करून कुऱ्हाडीने डोक्यात घाव घालून आईचा खून केला. तसेच तुम्ही घराचा दरवाजा तोडून आत आल्यास तुमचाही खून करीन, अशी धमकी वडिलांना दिली. या घटनेची वडूज पोलिस ठाण्यात नोंद झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी मुलगा किरण शिंदे याला अटक केली. 

तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक एस. सी. गोसावी यांनी तपास करून वडूज न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. न्यायालयापुढे आलेले पुरावे आणि दहा साक्षीदारांची साक्ष ग्राह्य धरून न्यायालयाने किरण शिंदे याला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जिल्हा सरकारी वकील अजित प्रताप कदम यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले. 

हा खटला चालविण्याकामी उपविभागीय पोलिस अधिकारी रणजित सावंत व पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. तसेच प्रॉसिक्युशन स्काॅडचे पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय जाधव, महिला पोलिस हवालदार विजयालक्ष्मी दडस, सागर सजगणे, अमीर शिकलगार व जयवंत शिंदे यांनी सहकार्य केले.

Web Title: Son sentenced to life imprisonment for mother's murder Vaduz court verdict

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.