Crime News: खळबळजनक! पोटच्या मुलानेच केला वृध्द पित्याचा खून, माण तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2022 14:12 IST2022-04-30T14:11:02+5:302022-04-30T14:12:03+5:30
दहिवडी : ज्या मुलाला आयुष्यभर संभाळले त्या पोटच्या मुलाने स्वतःच्याच वृध्द पित्याचा कुराडीने घाव घालून खून केला. या घटनेने ...

Crime News: खळबळजनक! पोटच्या मुलानेच केला वृध्द पित्याचा खून, माण तालुक्यातील घटना
दहिवडी : ज्या मुलाला आयुष्यभर संभाळले त्या पोटच्या मुलाने स्वतःच्याच वृध्द पित्याचा कुराडीने घाव घालून खून केला. या घटनेने माण तालुक्यात खळबळ माजली आहे. पांडुरंग बाबुराव सस्ते (वय ७० ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
कासारवाडी (ता.माण ) येथील आरोपी मुलगा नटराज पांडुरंग सस्ते हा आपले वृध्द वडील पांडुरंग बाबुराव सस्ते यांच्यावर मला मटण का खाऊ घालत नाही म्हणून चिडला होता. शुक्रवारी सायंकाळी ४ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास कासारवाडी येथील स्वतःच्या मालकीच्या भंडारदरा मळवी या शिवारात पाठीमागून डोक्यावर व मानगुटीवर मुलगा नटराज यांने वडील पांडुरंग सस्ते यांच्यावर कुराडीने घाव घालून गंभीर जखमी केले. त्यानंतर ते जागीच रक्ताच्या थारोळ्यात मृत होऊन पडले.
ही घटना गावभर पसरताच सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर चतुराबाई पांडुरंग सस्ते (वय ६० ) यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. दहिवडी पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक डी. डी. तुपे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी नटराज सस्ते यास पोलिसांनी अटक केली आहे.