सोसायटीची निवडणूक बिनविरोध
By Admin | Updated: January 18, 2016 22:16 IST2016-01-18T22:14:01+5:302016-01-18T22:16:30+5:30
विंचुरी दळवी : नूतन संचालकांचा सत्कार

सोसायटीची निवडणूक बिनविरोध
सिन्नर : तालुक्यातील विंचुरी दळवी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली.
निवडणूक निर्णय अधिकारी एस. बी. कासार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणुकीत संचालक मंडळाच्या १३ जागांसाठी १७ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. तथापि, माघारीच्या निर्धारीत वेळेत सर्वसाधारण गटातून दत्तात्रय पोपट शेळके, इतर मागास प्रवर्गातून संपत होनाजी चंद्रे व भाऊराव रामकृष्ण शेळके यांनी, तर भटक्या विमुक्त जाती गटातून रामनाथ कारभारी सानप यांनी माघार घेतल्याने निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला.
संचालक मंडळाच्या तेरा जागांसाठी तेराच अर्ज शिल्लक राहिल्याने सर्वसाधारण गटाच्या सात जागांवर विश्राम बाळाजी शेळके, पांडुरंग निवृत्ती दळवी, कारभारी केरू जाधव, लक्ष्मण आवडाजी भोर, भाऊराव रामकृष्ण शेळके, बाळू कृष्णा भोर, संपत होनाजी चंद्रे, रमेश सीताराम दळवी यांची, तर इतर मागास वर्गाच्या एका जागेवर सुरेश फकिरा दळवी, महिला राखीव गटाच्या दोन जागांवर लता निवृत्ती भांगरे व अलका मोहन दळवी, अनुसूचित जमातीच्या जागेवर उत्तम एकनाथ बर्वे, तर भटक्या जाती जमातीच्या एकाजागेवर भगवान पांडुरंग सांगळे यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी कासार यांनी जाहीर केले.
सचिव के. डी. हरळे यांनी निवडणूक कामात सहकार्य केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुकाध्यक्ष शरद शिंदे, सरपंच भाऊराव पवार, भाऊसाहेब दळवी, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष जयराम दळवी यांच्या हस्ते नूतन संचालकांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मनसेचे तालुका उपाध्यक्ष गोपाळा गायकर, कैलास दातीर, मोतीराम जाधव, तुकाराम शेळके, पांडुरंग दळवी, संजय काळे, संतोष लोंढे, कचरू शेळके, बळवंच बर्वे, रमाकांत बर्वे, रमेश झाडे, बाळासाहेब मोरे, दामोधर शेळके, पांडुरंग डावरे आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)