अरे बापरेऽऽऽ पाचगणीत वॉशिंग मशीनमध्ये सापडला साप, कुटुंबीयांची उडाली घाबरगुंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 19:32 IST2026-02-14T19:32:04+5:302026-02-14T19:32:41+5:30

ॲनिमल रेस्क्यू टीमकडून सुरक्षित सुटका

Snake found in washing machine in Panchgani | अरे बापरेऽऽऽ पाचगणीत वॉशिंग मशीनमध्ये सापडला साप, कुटुंबीयांची उडाली घाबरगुंडी

अरे बापरेऽऽऽ पाचगणीत वॉशिंग मशीनमध्ये सापडला साप, कुटुंबीयांची उडाली घाबरगुंडी

पाचगणी : पाचगणी शहरातील एका घरातील वॉशिंग मशीनमध्ये चक्क साप आढळून आला. यामुळे कुटुंबीयांची एकच घाबरगुंडी उडाली. तत्काळ ॲनिमल रेस्क्यू टीमशी संपर्क साधला असता त्वरित रेस्क्यूअर राजेश चौरसिया आणि गणेश शेलार घटनास्थळी दाखल होऊन वॉशिंग मशीन मधील सापाची सुटका केली. ही घटना बुधवारी रात्री घडली.

पाचगणी येथील एका घरात नेहमीप्रमाणे घरगुती कामासाठी मशीन उघडताच आत साप असल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ खबरदारी घेत घराबाहेर सुरक्षित अंतरावर थांबून ॲनिमल रेस्क्यू टीमशी संपर्क साधला. माहिती मिळताच रेस्क्यूअर राजेश चौरसिया आणि गणेश शेलार हे उशिरा रात्री घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रथम परिस्थितीचा शांतपणे आढावा घेत कुटुंबीयांना धीर दिला. वॉशिंग मशीनची रचना, सापाची हालचाल आणि संभाव्य धोके लक्षात घेऊन अत्यंत काळजीपूर्वक सुटका मोहीम राबविण्यात आली.

अरुंद जागेत लपलेल्या सापाला कोणतीही इजा न होऊ देता आणि घरातील सदस्यांची सुरक्षितता अबाधित ठेवत रेस्क्यूअरनी कौशल्याने त्याला बाहेर काढले. संबंधित साप हा ‘पहाडी तस्कर’ (Montane Trinket Snake) प्रजातीचा असल्याचे ओळखण्यात आले. हा पाचगणी परिसरात आढळणारा सामान्य बिनविषारी साप असून तो माणसांसाठी निरुपद्रवी आहे. पर्यावरणीय संतुलन राखण्यात या सापाची महत्त्वाची भूमिका असते. विशेषतः उंदरांची संख्या नियंत्रणात ठेवण्यास तो उपयुक्त ठरतो.

सुटकेनंतर सापाची प्राथमिक तपासणी करून त्याला कोणतीही दुखापत झाली नसल्याची खात्री करण्यात आली. त्यानंतर त्याला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

Web Title : पांचगनी में वॉशिंग मशीन में मिला सांप; परिवार दहशत में।

Web Summary : पांचगनी में एक वॉशिंग मशीन के अंदर सांप मिलने से दहशत फैल गई। एनिमल रेस्क्यू टीम ने बिना जहर वाले सांप को सुरक्षित रूप से निकाला और उसे बिना नुकसान पहुंचाए प्राकृतिक आवास में छोड़ दिया।

Web Title : Snake found in washing machine in Panchgani; family terrified.

Web Summary : A snake was discovered inside a washing machine in Panchgani, causing panic. Animal rescuers safely removed the non-venomous Montane Trinket Snake and released it back into its natural habitat after ensuring it was unharmed.