थोरल्या जावेने धाकट्या जावेला केली मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 19:03 IST2019-12-26T18:58:25+5:302019-12-26T19:03:35+5:30

तुझ्या पतीला पुसेगावच्या यात्रेला घेऊन जाणार असल्याचे थोरल्या जावेने सांगितल्यानंतर त्यास आक्षेप घेणाऱ्या धाकट्या जावेने निवार्णीचा इशारा दिला. त्यानंतर थोरल्या जावेने धाकट्या जावेस मारहाण केली. त्याचबरोबर सासऱ्याला शिवीगाळ केली. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात थोरल्या जावेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Small beating kills beats with big junk | थोरल्या जावेने धाकट्या जावेला केली मारहाण

थोरल्या जावेने धाकट्या जावेला केली मारहाण

ठळक मुद्देथोरल्या जावेने धाकट्या जावेला केली मारहाणबोरजाईवाडीतील घटना : सासऱ्याला देखील शिवीगाळ

कोरेगाव : तुझ्या पतीला पुसेगावच्या यात्रेला घेऊन जाणार असल्याचे थोरल्या जावेने सांगितल्यानंतर त्यास आक्षेप घेणाऱ्या धाकट्या जावेने निवार्णीचा इशारा दिला. त्यानंतर थोरल्या जावेने धाकट्या जावेस मारहाण केली. त्याचबरोबर सासऱ्याला शिवीगाळ केली. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात थोरल्या जावेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी, अंजना दत्तात्रय मोरे या बोरजाईवाडी येथे राहण्यास असून, बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास राहत्या घरासमोर त्या भांडी घासत होत्या. त्यावेळी त्यांची थोरली जाऊ विजया संदीप मोरे या त्या ठिकाणी आल्या. त्यांनी अंजना यांना सांगितले की, तुझे पती दत्तात्रय यांना घेऊन पुसेगावच्या यात्रेला जाणार आहे.

त्यावर अंजना यांनी त्यांना माज्या पतीबरोबर का जाणार आहेस, माज्या पतीबरोबर जायचे नाही, असे स्पष्टपणे बजावले. त्यानंतर विजया मोरे यांनी अंजना मोरे व त्यांचे सासरे यशवंत कृष्णा मोरे यांना शिवीगाळ केली. तसेच दगड हातात घेऊन रागाच्या भरात अंजना मोरे यांना मारला. त्यामध्ये त्यांच्या ओठाला जखम झाली आहे.

याप्रकरणी अंजना मोरे यांनी फिर्याद दिली असून, कोरेगाव पोलीस ठाण्यात विजया मोरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार विजय जाधव अधिक तपास करत आहेत.

Web Title: Small beating kills beats with big junk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.