शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
2
शांतिगिरी महाराजांचा सहा मतदार संघात पाठींबा कोणाला? आज भूमिका जाहीर करणार
3
'ज्यांना दोन बायका, त्यांना काँग्रेस देणार २ लाख रुपये'; वरिष्ठांसमोरच उमेदवाराची घोषणा
4
‘माझा धाकटा भाऊ तोफ, मीच त्याला रोखून ठेवलंय, अन्यथा’, असदुद्दीन ओवेसींचा राणांना इशारा
5
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
6
'लसीवर दुष्परिणाम छापले होते'; कोव्हिशिल्डबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण
7
कतारनंतर भारताचा आणखी एक राजनैतिक विजय, इराणने इस्रायलच्या मालवाहू जहाजावर असलेल्या ५ भारतीयांची केली सुटका
8
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
9
Sanjiv Goenka Net Worth: KL Rahul वर संतापलेले संजीव गोएंका कोण? माहितीये किती आहे नेटवर्थ?
10
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कामय, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...
11
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...
12
विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज
13
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
14
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
15
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
16
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
17
प्रियांका गांधी अखेर मैदानात उतरल्या! जिथे जिथे जातात...
18
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
19
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
20
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल

माउलींच्या पादुकांचा नीरा स्नानाचा थाटच न्यारा!, लाखो वारकऱ्यांनी याची देही याची डोळा क्षण अनुभवला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 1:39 PM

चांदोबाचा लिंब येथे उद्या उभे रिंगण

नसीर शिकलगारफलटण :नीरा भिवरी पडता दृष्टी,स्नान करिता सुद्ध सृष्टी।अंती तो वैकुंठ प्राप्ती,ऐसे परमेष्टी बोलिल...अशा अभंगाच्या ओवी आळवित वारकऱ्यांनी लाखो वारकऱ्यांनी नीरा स्नानाचा क्षण याची देही याची डोळा अनुभवला. प्रथेप्रमाणे श्री संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन होत असताना रविवारी नीरा स्नान पार पडत पडला. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. त्यांनी माउली माउलीचा गजर केला.ऐतिहासिक ,सामाजिक व क्रांतिकारी विचारांचा वारसा लाभलेल्या तसेच गुरू हैबतबाबा यांची जन्मभूमी असलेल्या सातारा जिल्ह्यामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा विसावला. या जिल्ह्यात माउलींच्या पालखीचा थाठ आणखी वाढणार आहे. सातारा जिल्ह्यामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा यंदा पाच दिवस मुक्काम आहे. यावर्षी फलटण येथील एक मुक्काम कमी झालेला आहे. आळंदी ते पंढरपूर पालखी मार्गावर नीरा नदीवर माउलींच्या पादुकांना स्नान घालण्याचा दिव्य सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली होती.श्री हैबतबाबा हे सातारा जिल्ह्यातील आरफळचे होते. श्रीमंत महादजी शिंदे यांच्या दरबारात ते सरदार होते. संत ज्ञानेश्वर माउलींचे निस्सीम भक्त असलेल्या हैबतबाबानी १८३२ मध्ये माउलींचा पालखी सोहळा सुरू केला. त्यांचे वंशज बाळासाहेब आरफळकर पवार हे सोहळ्याचे मालक आहेत. त्यांच्या अधिपत्याखाली सोहळा चालतो. त्याकाळी या सोहळ्याला श्रीमंत शितोळे सरकार तसेच इतरांनी मोठे सहकार्य केले होते. पालखी सोहळ्याचे महत्त्वही त्या काळात वाढविण्यासाठी अनेकांनी योगदान दिले होते. ती परंपरा आजही चालू आहे. पालखी सोहळा प्रस्थान करत असताना आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान माउलींच्या पादुका हैबतबाबांचे वंशज बाळासाहेब आरफळकर यांच्या स्वाधीन करते.आळंदी ते पंढरपूर व परत आळंदीला माघारी येईपर्यंत त्या त्यांच्या ताब्यात असतात. स्वतः आरफळकर वारीसोबत असतात. ज्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सुरू केला. त्यांच्या जिल्ह्यात माउलींचे आगमन होताना अनेकांना भरून आले होते. माउलींचे स्वागत करण्यासाठी प्रशासन, राजकीय नेते मंडळी असतातच, पण जिल्ह्यातील अनेक भाविक पण स्वागतासाठी स्वतःहून उपस्थित होते.

चांदोबाचा लिंब येथे उद्या उभे रिंगणलोणंदमध्ये दोन दिवसांसाठी पालखी सोहळा विसावला आहे. मंगळवार, दि. २० रोजी सोहळा फलटण तालुक्यात प्रवेश करणार आहे. दुपारी चांदोबाचा लिंब येथे पालखी मार्गावरील ऐतिहासिक उभे रिंगण पार पडणार आहे. त्यानंतर सोहळा तरडगाव येथील पालखी तळावर मुक्कामासाठी विसावणार आहे.

बुधवार, दि. २१ रोजी ऐतिहासिक आणि प्राचीन फलटणनगरीत सोहळा मुक्कामासाठी विसावणार आहे. आळंदी ते पंढरपूर या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील फलटण हे महत्त्वाचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने येथून पंढरपूरला पायी जाण्यासाठी आणखी भाविक सहभागी होत असतात. त्यामुळे सोहळ्यात गर्दी आणखी वाढते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAshadhi Ekadashiआषाढी एकादशीsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखी