सातारा हादरलं! न्यायालय परिसरातच गुंड बंटी जाधवसह सहकाऱ्यांवर गोळीबार; संशयित पोलिसांच्या ताब्यात
By दीपक शिंदे | Updated: August 7, 2023 17:49 IST2023-08-07T17:10:47+5:302023-08-07T17:49:39+5:30
वाई : न्यायालय परिसरात दोन युवकांवर गोळीबार करण्यात आला आहे. वाई शहरात मध्यवस्तीत घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. या ...

सातारा हादरलं! न्यायालय परिसरातच गुंड बंटी जाधवसह सहकाऱ्यांवर गोळीबार; संशयित पोलिसांच्या ताब्यात
वाई : न्यायालय परिसरात दोन युवकांवर गोळीबार करण्यात आला आहे. वाई शहरात मध्यवस्तीत घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर पाेलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. गोळीबाराच्या या घटनेने जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्न पुन्हा एेरणीवर आला. आज, सोमवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली.
कुख्यात गुंड अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव (राहणार- भुईंज) आणि निखिल माेरे व अभिजीत शिवाजी मोरे (राहणार- गंगापुरी, वाई) यांच्यावर आज वाई न्यायालय परिसरात गोळीबार झाला. या तिघांना मेणवली (ता. वाई) येथील हॉटेल व्यावसायिकाला दहा लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करून दरोडा टाकल्याप्रकरणी पोलिसांनी कळंबा कारागृहातून नुकतीच अटक केली होती.
त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. आज त्यांच्यावर न्यायालय परिसरात गोळीबार झाला. या घटनेनंतर न्यायालय परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला. प्राथमिक माहितीनूसार गोळीबार केल्याप्रकणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.