दुकानदाराने ऐकले नाही म्हणून अखेर पोलिसांनी पुसेवाळीत हे केले....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 11:06 IST2020-04-27T11:03:33+5:302020-04-27T11:06:26+5:30

पुसेसावळी(सात‍ारा): कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांनी लागू केलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पुसेसावळी येथील युवराज नंदकुमार सोलापूरे याच्या विरोधात ...

The shopkeeper did not listen so the police finally did it in Pusewali .... | दुकानदाराने ऐकले नाही म्हणून अखेर पोलिसांनी पुसेवाळीत हे केले....

दुकानदाराने ऐकले नाही म्हणून अखेर पोलिसांनी पुसेवाळीत हे केले....

ठळक मुद्देपुसेसावळीतील किराणा दुकानदारावर गुन्हा दाखल

पुसेसावळी(सात‍ारा): कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांनी लागू केलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पुसेसावळी येथील युवराज नंदकुमार सोलापूरे याच्या विरोधात पुसेसावळी दूरक्षेत्रात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, येथील दत्त चौकात सोलापूरे यांचे किराणा मालाचे दुकान आहे.त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करत दुकान सुरु ठेवल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला.याप्रकरणी किरण नामदेव हिरवे यांनी पोलीसांत फिर्याद दिली आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार सुधीर येवले करीत आहेत.

 

Web Title: The shopkeeper did not listen so the police finally did it in Pusewali ....