शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाडात अवतरली ‘शिवसृष्टी’

By admin | Updated: April 21, 2015 01:01 IST

शिवमूर्तीची प्रतिष्ठापना उत्साहात : देखाव्यांमधून साकाराले गडकोट

कऱ्हाड : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सोमवार, दि. २० रोजी सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त कऱ्हाडातही जय्यत तयारी करण्यात आली असल्याने यावर्षीची शिवजयंती सर्वांसाठी पर्वणीची ठरत आहे. शहरातील सार्वजनिक मंडळांकडून महाराष्ट्रातील दुर्मिळ असलेले आकर्षक गडकोट किल्ले यांच्या प्रतीकात्मक प्रतिकृतींच्या देखाव्यांची उभारणी करण्यात आली आहे. या देखाव्यांमुळे कऱ्हाडात शिवसृष्टी अवतरली असल्यासारखे दिसून येत आहे.शहरातील छत्रपती शाहू महाराज चौक या ठिकाणी छत्रपती शिवरांयांचा सिंहासनावर असलेला देखावा, पाटण कॉलनी श्री शिवाजी गणेश क्रीडा मंडळ व श्री साई दत्त नवरात्र उत्सव मंडळांतर्फे दरबार देखावा, कर्मवीर चौक येथे एका तरुण मंडळातर्फे ‘प्राणी वाचवा’ असा संदेश देणारा देखावा आकर्षक प्रतिकृतीतून उभारला आहे. तर शनिवार पेठ येथेही उभारण्यात आलेला देखावा नागरिकांचे आकर्षण ठरत आहे. तसेच पोपटभाई पेट्रोल पंप चौक, कोल्हापूर नाका, चावडी चौक, आझाद चौक, पावसकर गल्ली, मंडई परिसर, नूतन मराठी शाळा परिसर, महिला महाविद्यालय, पे्रमलाताई चव्हाण तंत्रनिकेतन महाविद्यालय परिसर, प्रीतिसंगम बाग परिसर आदी ठिकाणी सार्वजनिक मंडळांकडून आकर्षक देखावे उभारण्यात आले आहेत. तालुक्यातील १०९ पेक्षा जास्त ठिकाणी तसेच शहरात शंभरपेक्षा जास्त हिंदू एकता आंदोलनाच्या माध्यमातून शिवमूर्तींची प्रतिष्ठापना करत आकर्षक देखाव्यांची उभारणी करण्यात आली आहे. शहरातील दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळ्यासमोरील शिवबा गु्रप मंडळाकडून दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी आकर्षक देखावा उभारण्यात आला आहे. शहरतील मध्यवर्ती ठिकाणी उभारण्यात आलेल्या देखाव्याला आकर्षक विद्युत रोषणाई देखील करण्यात आली. त्यामुळे अत्यंत उठावदार नक्षीकाम करण्यात आलेला व विद्युत रोषणार्इंनी सजवण्यात आलेला देखावा नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.तालुक्यातील अनेक गावांमध्ये शिवसैनिकांकडून सोमवारी दिवसभर शहरातून ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत शिवमूर्तींची मिरवणूक काढण्यात आली. गडकोट तसेच किल्ल्यांवरून आणलेल्या शिवज्योतीचे शिवसैनिकांकडून दत्त चौकातील अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात येत होते. (प्रतिनिधी)