महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी शिवराज मोरे यांची निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 15:08 IST2025-08-01T15:08:16+5:302025-08-01T15:08:52+5:30

दिल्ली येथे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब यांनी दिले निवडीचे पत्र

Shivraj More elected as Maharashtra Pradesh Youth Congress President | महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी शिवराज मोरे यांची निवड

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी शिवराज मोरे यांची निवड

कऱ्हाड: येथील काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते शिवराज बापूसाहेब मोरे यांची आज, शुक्रवारी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. दिल्ली येथे युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.

शिवराज मोरे हे कॉंग्रेसच्या मुशित तयार झालेले नेतृत्व आहे. विद्यार्थी काँग्रेस पासून त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. सलग दोन वेळा महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्षपद त्यांनी सांभाळले आहे. त्यानंतर युवक काँग्रेसची निवडणुक त्यांनी लढवली. त्यामध्ये उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. काही महिन्यापूर्वी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली होती.तर आता प्रदेश अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे.

शुक्रवार (दि.१) रोजी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत महाराष्ट्र युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब यांच्या हस्ते त्यांना देण्यात आले. यावेळी इतर पदाधिकारी उपस्थित होते. काँग्रेस मधील हे संघटनात्मक पातळीवरील फेरबदल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या सूचनेनुसार करण्यात आले असल्याचे सांगितले जाते.

Web Title: Shivraj More elected as Maharashtra Pradesh Youth Congress President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.