शिवसेना-भाजपचा युती धर्माला हरताळ--: माण विधानसभा मतदारसंघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 07:47 PM2019-10-04T19:47:26+5:302019-10-05T00:12:15+5:30

साहजिकच संपूर्ण राज्यामध्ये भाजप, शिवसेना, रासप, रिपाइं, रयत क्रांती संघटना या महायुतीच्या घटक पक्षांमध्ये समजुतीने जागावाटप झालेले असताना प्रत्येक ठिकाणी एकमेकांच्या उमेदवारांसाठी हे सर्व पक्ष एकत्रितपणे काम करणार आहेत; परंतु

Shiv Sena-BJP contesting in Mann constituency | शिवसेना-भाजपचा युती धर्माला हरताळ--: माण विधानसभा मतदारसंघ

शिवसेना-भाजपचा युती धर्माला हरताळ--: माण विधानसभा मतदारसंघ

Next
ठळक मुद्देभाजपचा जयकुमार गोरे यांना तर शिवसेनेचा शेखर गोरे यांना एबी फॉर्मत्यामुळे गोरेंविरोधात सर्वपक्षीय उमेदवार कोण असेल, हे पाहण्याजोगे आहे.

सागर गुजर ।


सातारा : संपूर्ण राज्यभर शिवसेना-भाजप युती धर्माला जागून विधानसभा निवडणूक लढणार असली तरीसुद्धा माण मतदारसंघामध्ये या युती धर्माला दोन्ही पक्षांनी हरताळ फासला आहे. या मतदारसंघामध्ये भाजपकडून जयकुमार गोरे तर शिवसेनेकडून शेखर गोरे एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढणार आहेत.

विशेष म्हणजे गोरे बंधूंना आता भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षांनी एबी फॉर्मही दिला आहे. विधानसभेच्या निवडणूक अर्जासोबत या दोघांचे एबी फॉर्म जोडले गेले आहेत. भाजपने जयकुमार गोरे यांना आपल्या पक्षात घेऊन त्यांची उमेदवारी घोषित केली आहे. पक्षातर्फे नुकत्याच जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीमध्ये माण मतदारसंघामध्ये जयकुमार गोरे यांना उमेदवारी दिल्याचे स्पष्ट केले आहे, तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेत प्रवेश केलेले त्यांचे बंधू शेखर गोरे यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज भरताना सोबत शिवसेनेचा एबी फॉर्म जोडला आहे. साहजिकच संपूर्ण राज्यामध्ये भाजप, शिवसेना, रासप, रिपाइं, रयत क्रांती संघटना या महायुतीच्या घटक पक्षांमध्ये समजुतीने जागावाटप झालेले असताना प्रत्येक ठिकाणी एकमेकांच्या उमेदवारांसाठी हे सर्व पक्ष एकत्रितपणे काम करणार आहेत; परंतु माण-खटावमध्ये मात्र मित्रपक्षांमध्ये टक्कर होताना पाहायला मिळणार आहे.

माण आणि खटाव या दोन्ही तालुक्यांचे राजकारण अत्यंत क्लिष्ट स्वरुपाचे आहे. याठिकाणी फोडाफोडीच्या राजकारणाने कायमच डोके वर काढलेले पाहायला मिळते. माजी आमदार जयकुमार गोरे आणि त्यांच्याविरोधात रासपकडून मागील विधानसभा निवडणूक लढलेले शेखर गोरे यांना बाजूला ठेवून सर्वपक्षीय आघाडी एकत्रित आली होती. गोरे बंधूंचे राजकारण संपवण्यासाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, रासप या पक्षांतील नेते उठून बसले होते. ‘आमचं ठरलंय’ म्हणत या सर्वपक्षीय नेत्यांच्या अनेक बैठकाही विविध ठिकाणी पार पडल्या. साताºयात नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये आमचं ठरलंय आघाडीतर्फे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई यांच्या नावाची माण मतदारसंघासाठी घोषणा केली.

गोरे बंधूंच्या विरोधात एकत्रित आलेल्या या सर्वपक्षीयांची मोट आता बांधण्यात आली आहे. मात्र त्यांचा उमेदवार कोण? हेच निश्चित झालेले नाही. माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याची सूचना केली. त्यानंतर देशमुख यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. रणजितसिंह देशमुख यांनीही शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. खटावचे माजी सभापती संदीप मांडवे यांना राष्ट्रवादीचा मित्रपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उमेदवारी दिली असून, त्यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे गोरेंविरोधात सर्वपक्षीय उमेदवार कोण असेल, हे पाहण्याजोगे आहे.

 

आम्ही माण मतदारसंघ शिवसेनेसाठी मागितला होता. वरिष्ठ पातळीवरून शेखर गोरे यांच्या उमेदवारीला ‘हिरवा कंदील’ मिळाला आहे, त्यामुळे शेखर गोरे यांना शिवसेनेचा एबी फॉर्म दिला आहे.
- चंद्रकांत जाधव , जिल्हा प्रमुख शिवसेना



 

Web Title: Shiv Sena-BJP contesting in Mann constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.