शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

शिरवळच्या उपसरपंचांचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:51 IST

शिरवळ : राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील म्हणून समजल्या जाणाऱ्या शिरवळचे उपसरपंच सुनील देशमुख यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा सरपंच लक्ष्मी पानसरे यांच्याकडे ...

शिरवळ : राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील म्हणून समजल्या जाणाऱ्या शिरवळचे उपसरपंच सुनील देशमुख यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा सरपंच लक्ष्मी पानसरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. ग्रामपंचायतीच्या मासिक सभेला देशमुख हे गैरहजर होते. ग्रामपंचायतीच्या मासिक सभेनंतर राजीनामा दिल्याने विविध चर्चेला उधाण आले आहे.

शिरवळ ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक २०१७ मध्ये झाल्यानंतर थेट सरपंचपदी भाजपच्या लक्ष्मी पानसरे निवडून आल्या. तेव्हा शिरवळमध्ये राष्ट्रवादीची अवस्था ‘गड आला पण सिंह गेला’ अशी होती. सदस्यपदी राष्ट्रवादीचे सदस्य अधिक प्रमाणात होते. सुरुवातीला राष्ट्रवादीकडून उपसरपंच पदाचा मान दिलीप गुंजवटे यांना मिळाला. त्यानंतर त्यांनी मुदत संपल्यानंतर उपसरपंच पदाचा राजीनामा दिला. याप्रसंगी उपसरपंच पदाच्या ८ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या निवडणुकीत राजकीय घडामोडी होत भाजपचे एक मत फ़ुटून राष्ट्रवादीचे सुनील देशमुख हे उपसरपंचपदी विजयी झाले. त्यामुळे भाजपच्या गटात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली होती. राष्ट्रवादीच्या सूत्रानुसार ठरल्याप्रमाणे उपसरपंच पदाची मुदत संपूनही सुनील देशमुख यांनी राजीनामा न दिल्याने विविध चर्चेला उधाण आले होते.

दरम्यान, शिरवळ ग्रामपंचायतीची मासिक सभा शुक्रवारी होती. त्यापूर्वीच उपसरपंच सुनील देशमुख हे उपसरपंचपदाचा राजीनामा देतील, अशी चर्चा रंगली होती. अशातच देशमुख हे मासिक सभेलाच गैरहजर राहिल्याने शिरवळमध्ये राजकीय वर्तुळात अस्वस्थता पसरली. बऱ्याच घडामोडी होत उपसरपंच सुनील देशमुख हे मासिक सभा संपल्यानंतर ग्रामपंचायतीत आले. त्यानंतर उपसरपंच पदाचा राजीनामा त्यांनी सरपंच लक्ष्मी पानसरे यांच्याकडे दिला.

यावेळी राष्ट्रवादीकडून ग्रामपंचायत सदस्य दिलीप गुंजवटे, ग्रामपंचायत सदस्या रिजवाना काझी उपस्थित होते. भाजपचे ग्रामपंचायत सदस्य महेश जाधव, कविता माने यांनीही सरपंच पानसरे यांच्याकडे उपसरपंच सुनील देशमुख हे राजीनामा देताना हजेरी लावल्याने, अनेकांच्या भुवया उंचावल्या. राजीनाम्यानंतर उपसरपंचपदी ग्रामपंचायत सदस्या रिजवाना काझी या प्रबळ दावेदार असल्या तरीही, शिरवळचा इतिहास पाहता, ऐनवेळी राजकीय घडामोडीनंतर नवीनच व्यक्ती विराजमान होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

चौकट

मासिक सभेनंतर उपसरपंच पदाचा राजीनामा?

शिरवळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुनील देशमुख हे विराजमान झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या ठरलेल्या सूत्रानुसार सुनील देशमुख यांनी राजीनामा देण्यासाठी विविध प्रकारे दबावतंत्राचा वापर करण्यात येत होता. काही दिवसांपासून सुनील देशमुख हे उपसरपंच पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यामुळे शुक्रवारच्या मासिक सभेकडे लक्ष लागून राहिले होते. उपसरपंच सुनील देशमुख सभेला गैरहजर राहिल्याने राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता पसरली. सभा संपताच ते शिरवळ ग्रामपंचायतीत दाखल झाले. सरपंच पानसरे यांच्याकडे राजीनामा दिल्यानंतर इच्छुकांचा जीव भांड्यात पडला. सरपंच पानसरे यांनी राजीनामा स्वीकारला असला तरी, राजीनाम्यानंतर येणाऱ्या तांत्रिक कायदेशीर बाबी मार्च महिन्यात पूर्ण होणार आहेत.