शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

जावली तालुका सुंदर गाव स्पर्धेत शिंदेवाडी प्रथम, फेरतपासणी होऊन निवड जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 16:33 IST

Zp Satara : निसर्ग सौंदर्याने नटलेल्या पाचगणीच्या पायथ्याशी वसलेल्या शिंदेवाडीला जावळी तालुक्यातून आर. आर. आबा पाटील सुंदर गाव पुरस्कार जाहीर झाला आहे. स्पर्धेत जावली तालुक्यातील चोरंबे व शिंदेवाडीची या दोन ग्रामपंचायतीमध्ये चुरस होती. सुरुवातीला चोरांबेला हा पुरस्कार जाहीर झाला होता. मात्र फेरतपासणी होऊन २०१९-२० करिता तालुक्यातून सुंदर गाव म्हणून शिंदेवाडीची निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्देजावली तालुका सुंदर गाव स्पर्धेत शिंदेवाडी प्रथमफेरतपासणी होऊन निवड जाहीर

कुडाळ : निसर्ग सौंदर्याने नटलेल्या पाचगणीच्या पायथ्याशी वसलेल्या शिंदेवाडीला जावळी तालुक्यातून आर. आर. आबा पाटील सुंदर गाव पुरस्कार जाहीर झाला आहे. स्पर्धेत जावली तालुक्यातील चोरंबे व शिंदेवाडीची या दोन ग्रामपंचायतीमध्ये चुरस होती. सुरुवातीला चोरांबेला हा पुरस्कार जाहीर झाला होता. मात्र फेरतपासणी होऊन २०१९-२० करिता तालुक्यातून सुंदर गाव म्हणून शिंदेवाडीची निवड करण्यात आली आहे.याबाबतचा निकाल नुकताच जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी जाहीर केला. सन २०१९-२० करिता आर. आर. आबा पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेअंतर्गत जावळी तालुक्यातील ग्रामपंचायतीची तपासणी गटविकास अधिकारी वाई यांच्या मार्फत करण्यात आली होती. यानुसार आठ फेब्रुवारी २०२१ रोजी गुणांकन करून यादी जिल्हा परिषदेकडे सुपूर्द करण्यात आली होती. यामध्ये तालुक्यातील चोरंबे गावाला ८९ गुण तर शिंदेवाडीला ८६ गुण दिले होते.मात्र शासन निर्णयातील तरतुदीनुसार सरपंच शिंदेवाडी यांनी हरकत घेऊन सदर गुणांकन मान्य नसल्याबाबत तक्रार केली होती. यानुसार चोरंबे व शिंदेवाडी या दोन्ही ग्रामपंचायतीची पुरस्काराच्या निकषानुसार ९ मार्च २०२१ रोजी फेरतपासणी करण्यात आली. यामध्ये गुणांकणानुसार शिंदेवाडीच्या आर. आर. आबा पाटील सुंदर गावच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

शिंदेवाडी ग्रामस्थांनी सुंदर गाव होण्यासाठी खूप परिश्रम घेतले. ग्रामस्थांच्या चिकाटीमुळे आणि केलेल्या प्रामाणिक कष्टामुळे आम्हाला यशाची आशा होती. आकस्मितपणे आम्ही स्पर्धेतून बाहेर पडलो परंतु आम्ही धीर सोडला नाही. त्यासाठी पाठपुरावा केला त्यामुळेच आम्ही आज सुंदर गाव योजनेचा प्रथम क्रमांक पटकविला आहे.- धनश्री शिंदे,सरपंच शिंदेवाडी

टॅग्स :zpजिल्हा परिषदSatara areaसातारा परिसर