शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

कराडात शिंदेसेनेची 'तक्रार', अपक्ष उमेदवाराला 'नोटीस'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 23:25 IST

घडतंय बिघडतंय : म्हणे,नेत्यांचे फोटो अन् चिन्हाचा गैरवापर, मतभेद चव्हाट्यावर

कराड-कराड नगरपालिकेच्या  निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात असणाऱ्या रणजीत पाटील यांनी शिंदेसेनेच्या नेत्यांचा फोटो व चिन्ह अनाधिकाऱ्यांने वापरून मतदारांची दिशाभूल चालवली आहे. त्यांच्यावर कारवाई करावी अशी तक्रार शिंदेसेनेच्या पदाधिकार्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे मंगळवारी केली. त्यावरून निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी रणजीत पाटील यांना नोटीस काढली असून याबाबत खुलासा करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणात नेमके काय होणार? याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.

दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी असणाऱ्या कराड नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक २ डिसेंबर रोजी होऊ घातली आहे. अर्ज दाखल करणे, छाननी, माघार ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाली असून नगराध्यक्ष पदासाठी ९ उमेदवार रिंगणात उभे आहेत. पैकी रणजीत पाटील हे अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या फ्लेक्स व पत्रकावर त्यांनी शिवसेनेच्या चिन्हाचा ब नेत्यांच्या फोटोचा गैरवापर केल्याची शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांची तक्रार आहे. 

खरंतर रणजीत पाटील हे देखील शिंदेसेनेचेच कार्यकर्ते असून एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात. परंतु कराड पालिका निवडणुकीत शिंदे सेनेच्या जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र यादव यांनी पक्षीय चिन्हा ऐवजी आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात नगराध्यक्ष पदासाठी दंड थोपटले आहेत. मात्र यामुळे नाराज झालेल्या रणजीत पाटील यांनी देखील अपक्ष उमेदवार म्हणून दंड थोपटले आहेत. या दोघांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कराडसाठी मोठा विकास निधी आणला असून दोघेही त्यांच्या छबी वापरत आहेत. 

मात्र मंगळवारी शिंदेसेनेच्या जिल्हाप्रमुख, शहर प्रमुखांनी त्यांच्या या लेटर पॅड वर रणजीत पाटील यांच्या विरोधात तक्रार दिल्याने शिंदेसेने अंतर्गत वाद आता चांगलाच पेटला आहे. या तक्रारीवरून निवडणूक अधिकार्यांनी रणजीत पाटील यांना नोटीस काढली आहे. पण आता पाटील नेमका काय खुलासा करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे आलेल्या तक्रारीवरून खुलासा करण्याबाबतचे पत्र मला दिले आहे‌. मी २ दिवसात याबाबतचा खुलासा निवडणूक अधिकाऱ्यांकडे देणार आहे. रणजीत पाटील, अपक्ष उमेदवार, कराड

English
हिंदी सारांश
Web Title : Karad: Shinde Sena objects to independent candidate's use of symbols.

Web Summary : Independent candidate in Karad faces notice for allegedly misusing Shinde Sena leaders' photos and symbols. A complaint was filed, prompting an investigation by election officials.
टॅग्स :Shiv SenaशिवसेनाKaradकराड