Satara ZP Election 2026: पाटणमध्ये शिंदेसेनेची सत्ता; भाजपमध्ये जाऊनही पाटणकर गट अपयशी

By दत्ता यादव | Updated: February 11, 2026 17:07 IST2026-02-11T17:04:03+5:302026-02-11T17:07:35+5:30

भाजपला केवळ एका जागेवर समाधान

Shinde Sena leader Shambhuraj Desai has a strong hold on Patan, Patankar group fails despite joining BJP | Satara ZP Election 2026: पाटणमध्ये शिंदेसेनेची सत्ता; भाजपमध्ये जाऊनही पाटणकर गट अपयशी

Satara ZP Election 2026: पाटणमध्ये शिंदेसेनेची सत्ता; भाजपमध्ये जाऊनही पाटणकर गट अपयशी

दत्ता यादव

सातारा : पाटण पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिंदेसेनेने जोरदार मुसंडी मारत एकहाती सत्ता मिळवली आहे. तालुक्याच्या राजकारणावर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आपली पकड अधिक मजबूत असल्याचे सिद्ध केले आहे. पंचायत समितीच्या १४ गणांपैकी १३ जागांवर शिंदेसेनेने विजय मिळवला, तर भाजपला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. त्यामुळे पंचायत समितीवर शिंदेसेनेचा भगवा फडकला आहे.

जिल्हा परिषद गटातही शिंदेसेनेची घोडदौड कायम राहिली असून, सात गटांपैकी सहा गटांत शिंदेसेनेने विजय मिळवला आहे. भाजपला येथेही केवळ एका गटावर विजय मिळवता आला. या निकालांमुळे भाजपसाठी हा निकाल आत्मचिंतन करायला लावणारा ठरला आहे. सातारा जिल्ह्यातील सर्वाधिक तुल्यबळ मानली जाणारी पाटणकर-देसाई गटाची पारंपरिक राजकीय लढत या निवडणुकीत पुन्हा एकदा चर्चेत आली. जिल्हा परिषद व पंचायत समितीचे हे निकाल आगामी राजकारणाची दिशा ठरवणारे मानले जात आहेत.

गोकुळ तर्फे हेळवाक हा संपूर्ण जिल्हा परिषद गट सत्यजितसिंह पाटणकर यांचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र, उमेदवारीपासूनच विरोधकांनी या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला आणि त्यात त्यांना यश आले. गट व गणात मोठ्या फरकाने शिंदेसेनेने विजय मिळवत बालेकिल्ला उद्ध्वस्त केला. हा विजय शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांसाठी मोठी उभारी देणारा ठरला आहे.

म्हावशी जिल्हा परिषद गटात राजेश पवार (भाजप) व भरत साळुंखे यांच्यात चुरशीची लढत झाली. या लढतीत भाजपचे राजेश पवार यांनी बाजी मारली आणि ते भाजपचे एकमेव विजयी उमेदवार ठरले. या गटात एक जागा शिंदेसेनेला तर एक भाजपला मिळाली. हा गटही पाटणकरांचा बालेकिल्ला मानला जात होता. मंद्रुळकोळे गटात आमदार नरेंद्र पाटील यांच्या पत्नी डॉ. प्राची पाटील यांचा १०१९ मतांनी पराभव झाला. विविध सामाजिक उपक्रम असूनही मतदारांनी त्यांना साथ दिली नाही. हा पराभव नरेंद्र पाटील व हिंदुराव पाटील यांना आत्मचिंतन करायला लावणारा ठरला आहे.

कालगाव, तारळे, मल्हारपेठ व मारुल हवेली या गटांचे निकाल भाजप कार्यकर्त्यांसाठी धक्कादायक ठरले. काळगाव गटात भरत पाटील यांच्या पत्नींचा मोठ्या फरकाने पराभव झाला. एकूणच देसाई गटाने पाटण पंचायत समितीवर आपली एकहाती सत्ता कायम राखत तालुक्याच्या राजकारणात वर्चस्व सिद्ध केले आहे.

Web Title : शिंदे सेना का पाटण ZP चुनाव में दबदबा, बीजेपी गठबंधन के बावजूद पाटणकर गुट विफल

Web Summary : शिंदे सेना ने पाटण पंचायत समिति और जिला परिषद चुनावों में शानदार जीत हासिल की, अधिकांश सीटें जीतीं। बीजेपी में शामिल होने के बावजूद, पाटणकर गुट विफल रहा। यह परिणाम शंभूराज देसाई की मजबूत राजनीतिक पकड़ को दर्शाता है और सतारा में भविष्य के राजनीतिक बदलावों का संकेत देता है।

Web Title : Shinde's Sena Dominates Patan ZP Election, Patankar Faction Fails Despite BJP Alliance

Web Summary : Shinde's Sena secured a sweeping victory in the Patan Panchayat Samiti and Zilla Parishad elections, winning most seats. Despite joining BJP, the Patankar faction failed. This outcome highlights Shambhuraj Desai's strong political hold and signals future political shifts in Satara.