साताऱ्यात अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांनी शरद पवार यांचे स्वागत केले, चर्चेला उधाण आले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 11:53 IST2025-05-09T11:52:51+5:302025-05-09T11:53:38+5:30

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे रयत शिक्षण संस्थेतील कार्यक्रमाच्या निमित्ताने गुरुवारी सातारा मुक्कामी ...

Sharad Pawar welcome by the district president of Ajit Pawar group sparks discussion | साताऱ्यात अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांनी शरद पवार यांचे स्वागत केले, चर्चेला उधाण आले

साताऱ्यात अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांनी शरद पवार यांचे स्वागत केले, चर्चेला उधाण आले

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे रयत शिक्षण संस्थेतील कार्यक्रमाच्या निमित्ताने गुरुवारी सातारा मुक्कामी आल्याने शासकीय विश्रामगृहात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ठाण मांडल्याचे दिसून आले. याचवेळी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर यांनी तर पवार यांचे स्वागतही केले. त्यामुळे राजकीय चर्चांना चांगला ऊत आला आहे.

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची पुण्यतिथी ९ मे रोजी असते. त्यामुळे संस्थेचे अध्यक्ष शरद पवार हे दरवर्षी ८ मे रोजी साताऱ्यात मुक्कामी येतात. त्यांचा मुक्काम हा शासकीय विश्रामगृहातच असतो. शुक्रवारी होणाऱ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पवार हे गुरुवारी सायंकाळी सहा वाजता विश्रामगृहात दाखल झाले. यावेळी त्यांच्याबरोबर खासदार नीलेश लंके हेही होते.

तत्पूर्वी सैनिक स्कूलच्या मैदानावरील हेलिपॅडवर त्यांचे आमदार शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने, सरचिटणीस राजकुमार पाटील यांनी स्वागत केले. तर शासकीय विश्रामगृहावर पदाधिकाऱ्यांची मोठी गर्दी होती. याचवेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर हेही उपस्थित होते. त्यांनी पवार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर ते लगेच निघून गेले.

शासकीय विश्रामगृहातच पवार यांनी राजकीय नेते तसेच रयत शिक्षण संस्थेतील अधिकाऱ्यांची चर्चा करण्यास सुरुवात केली होती. रात्री उशिरापर्यंत बैठका सुरू हाेत्या. यावेळी माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील यांच्यासह इतर पदाधिकारीही उपस्थित होते.

Web Title: Sharad Pawar welcome by the district president of Ajit Pawar group sparks discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.