शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण बनणार? सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक विधान, म्हणाले...    
2
ज्या देशाच्या कारमधून पुतिन यांनी केला प्रवास; आता त्यांच्याचविरोधात उतरवले लढाऊ जहाज, तणाव वाढला
3
३१ डिसेंबर आहे अखेरची तारीख, 'ही' २ कामं पटापट आटोपून घ्या; केली नाही तर समस्यांना सामोरं जावं लागेल
4
संतापजनक...! गुजरातमध्ये 6 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, नराधमानं प्रायव्हेट पार्टमध्ये...; आरोपी 3 मुलांचा बाप!
5
क्रिकेट कोचला बॅटने बेदम मारहाण; २० टाके पडले! संघात न घेतल्यानं तिघे भडकले, अन्....
6
प्रेम, धोका आणि ब्लॅकमेलिंग! व्यापाऱ्याचा महिला DSP वर कोट्यवधी रुपये हडपल्याचा गंभीर आरोप
7
शिंदेंचा ‘वाघ’ थेट बिबट्याच्या वेशात विधान भवनात; हात जोडून सरकारला विनवणी, “गेली २० वर्षे...”
8
ममता बॅनर्जींनी केंद्र सरकारच्या आदेशाचा कागद फाडला! कशावरून रंगला 'हाय-व्होल्टेज' ड्रामा?
9
पाकिस्तानात शूट झालाय रणवीर सिंगचा 'धुरंधर'? अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- "तिथले गँगस्टर..."
10
माणुसकी संपली! हेल्थ चेकअपमध्ये कॅन्सर झाल्याचे कळले; IT कंपनीने २१ वर्षांचा अनुभव असलेल्या कर्मचाऱ्याला काढले 
11
'वीर सावरकर पुरस्कार' नाकारला! काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी HRDS इंडियाचा प्रस्ताव फेटाळला; 'सहमतीशिवाय घोषणा केल्याने' वाद
12
Viral Video: अरे, हे चाललंय तरी काय? जोडप्यानं हायवेवर कार बाजूला लावली अन् रस्त्यावरच...
13
२०२६ मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर, भाऊबीजेला अतिरिक्त सुट्टी; सरकारकडून अधिसूचना जारी
14
कोण सरस...? टाटा नेक्सॉन आणि मारुती विक्टोरिसची समोरासमोर टक्कर झाली; दोन्ही ५ स्टार, कोणाची काय हालत...
15
रुपया गडगडल्यामुळे देशात महागाई वाढणार? आयातदारांची चिंता वाढली, RBI आता काय करणार?
16
Silver Price Today: चांदीचा दर विक्रमी उच्चांकावर, किंमत १.९० लाख रुपयांच्या पुढे; आता गुंतवणूक करणं योग्य होईल का?
17
Nana Patole: निवडणूक आयोगाच्या कारभारावर आक्षेप; आयुक्तांना पदावरून हटवण्याची पटोलेंची मागणी
18
याला म्हणतात नशीब! गरिबीशी लढणाऱ्या २ मित्रांचं आयुष्यच बदललं; सापडला ५० लाखांचा हिरा
19
धक्कादायक! लग्नासाठी जमीन विकली; २ वेळा बनला नवरदेव, पण दोन्ही वेळा फसला, चुना लावून वधू पसार
Daily Top 2Weekly Top 5

Satara: राजकीय पोस्ट, शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला पोलिसांची मारहाण; पुसेगाव पोलिस ठाण्यासमोर आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 12:16 IST

कारवाईचे पोलिस अधीक्षकांचे आश्वासन

पुसेगाव : डिस्कळ, ता. खटाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या एका कार्यकर्त्याने समाजमाध्यमावर राजकीय भूमिकेतून पोस्ट टाकली. या प्रकारानंतर पुसेगाव पोलिसांनी त्याला पोलिस ठाण्यात नेऊन मारहाण केल्याचा आरोप करत आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुसेगाव पोलिस ठाण्याच्या आवारात बुधवारी सकाळी ठिय्या आंदोलन करण्यात आले.निवडणूक आयोगाने या प्रकरणाची तत्काळ दखल घेऊन संबंधित पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आमदार शशिकांत शिंदे यांनी यावेळी केली. पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते पुसेगाव पोलिस ठाण्यासमोर मोठ्या संख्येने जमले होते. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.यावेळी पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी या प्रकरणाची चाैकशी करून दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करू, असे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी सोनाली कदम यांनी आंदोलकांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले.

निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या आदर्श आचारसंहितेनुसार पुसेगाव पोलिस प्रशासन कार्यवाही करत आहे. यात दुजाभाव केला जात नाही व केला जाणार नाही. विविध नेतेमंडळी, कार्यकर्ते व नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे. - संदीप पोमण- सहायक पोलिस निरीक्षक, पुसेगाव पोलिस ठाणे

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४satara-acसाताराNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारPoliceपोलिसwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024