Shinde Shiv Sena Satara ZP election: ज्या सातारा प्रकरणावरून शिंदेसेना आणि भाजपामध्ये विधिमंडळात शाब्दिक चकमक बघायला मिळाली. त्याच प्रकरणावरून आता शिंदेसेनेच्या आमदारानेच स्वतःच्या पक्षाचेच कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाईंना सुनावले आहे. "पोलिसांना यामध्ये विनाकारण ओढणं चुकीचे आहे. पालकमंत्र्यांनी एवढा दंगा कशाला करायला पाहिजे? माझे दोन सदस्य होते. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पाच सदस्य फुटले, ते बघा ना. मी त्यांना सांगितले होते की, हे होणार नाही", असे म्हणत आमदार महेश शिंदे यांनी शंभूराज देसाईंनाच उघडे पाडण्याचा प्रयत्न केला आहे.
विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना शिंदेसेनेचे आमदार महेश शिंदे म्हणाले की, "माझ्या मतदारसंघात झालेल्या निवडणुकीच्या संदर्भात पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी एक बैठक बोलावली होती. त्यावेळी भाजपाचे प्रमुख नेते, अजित पवार गटाचे नेते होते. त्यावेळी असं ठरलं की आपापल्या मतदारसंघातील आमदार यावर निर्णय घेतील. त्यावेळी मी सुद्धा प्रयत्न केले."
ते आमच्या लोकांना आवडले नाही -आमदार शिंदे
"आम्ही भाजपासोबत निवडणूक पूर्व युती केली होती. आम्ही भाजपासोबत एकत्र लढलो आणि नंतर कळलं की, आपण काँग्रेस आणि शरद पवार गटासोबत जातोय. ते आमच्या लोकांना आवडलं नाही. आम्ही महायुतीसोबत जाण्यासाठी तयार होतो. पण महाविकास आघाडीसोबत आम्ही जाऊ शकत नाही," असे आमदार महेश शिंदे यांनी सांगितले.
"पोलीस यंत्रणेने कुठल्याही बळाचा वापर केलेला नाही. हे आमच्या नेत्याच्या निराशेतून झाले आहे. सदस्यांनी ऐकलं नाही, त्याचे फस्ट्रेशन शंभूराज देसाईंनी यंत्रणेवर काढलं. शंभूराज देसाई यांच्या सोबत जे सदस्य होते, त्यांच्यावर अपहरणाचा आरोप आहे. अपहरण झालेल्या व्यक्तीच्या मुलाने जाऊन तक्रार केली. त्यावरुन वादावदी झाली. शंभूराज देसाईंनी महायुतीला सोबत घ्यायला पाहिजे होते. ते न झाल्यानेच हे प्रकरण घडलं. आपण राज्यात एकत्र असताना तिथेही एकत्र असायला हवं होतं", असे सांगत आमदार शिंदे शंभूराज देसाईंची कोंडी केली आहे.
पोलिसांनी काही केले नाही, शंभूराज देसाईंच्या हाताला पेन लागला
"पालकमंत्र्यांच्यासोबत असलेले लोक पोलिसांवर धावून गेले. त्यांच्या दोन सदस्यांनी पोलिसांना मारल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. त्यांना सोडवायला पालकमंत्री गेले. त्यावेळी त्यांच्या हाताला त्यांच्या कार्यकर्त्याचा पेन लागला. पोलिसांनी काही केलेलं नाही. विनाकारण पोलिसांवर आरोप करु नये", असे सांगत झटापटीत हाताला मार लागल्याचा शंभूराज देसाईंचा आरोप खोटा असल्याचा दावा आमदार शिंदेंनी केला.
"एवढं मोठं पद गेल्याने शंभूराज देसाईंना त्रास होणार आहे. त्यांना वाटत होतं की, मी काँग्रेस शरद पवार गटासाोबत जाऊन सत्ता मिळवू शकतो. त्यांची ऐकीव माहिती आहे. जिल्ह्यातील लोकांना विचारा, सीसीटीव्ही पाहा असली कुठलीही गोष्ट घडलेली नाही", अशा शब्दात आमदार शिंदेंनी शंभूराज देसाईंना सुनावले.
...तर मी राजीनामा देईन, देसाईंना शिंदेंचे आव्हान
"स्थानिक पातळीवर निर्णय घ्यायचे निर्देश स्वतः पालकमंत्र्यांनी दिले होते. जो तो आमदार युती स्वतः ठरवेल. अशी बैठक झाली की नाही हे तुम्ही त्यांना विचारा; तसं नसेल तर मी आजही राजीनामा देईन. त्यांनी सांगितले की प्रत्येक आमदार स्वतःच्या सोईनुसार युती करेल पण महायुतीच्या बाहेर जाणार नाही. हे ठरलं होतं", अशा शब्दात आमदार शिंदेंनी देसाईंना उत्तर दिले.
Web Summary : Shinde Sena MLA Mahesh Shinde criticizes minister Shambhuraj Desai over Satara ZP election issues. Shinde alleges Desai unfairly blamed police due to frustration over lost support, further claiming Desai's actions contradict Mahayuti principles. Shinde challenges Desai, threatening resignation if claims are false.
Web Summary : शिंदे सेना के विधायक महेश शिंदे ने सतारा जिला परिषद चुनाव के मुद्दों पर मंत्री शंभूराज देसाई की आलोचना की। शिंदे ने आरोप लगाया कि देसाई ने समर्थन खोने की निराशा के कारण अनुचित तरीके से पुलिस को दोषी ठहराया, और आगे दावा किया कि देसाई की कार्रवाई महायुति सिद्धांतों के विपरीत है। शिंदे ने देसाई को चुनौती दी, झूठे दावों पर इस्तीफे की धमकी दी।