शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

‘काठावरची परंपरा’ शंभूराजनी मोडून काढली!

By admin | Updated: October 20, 2014 00:38 IST

थंड डोक्याने वापरलेला गनिमी कावा यशस्वी ठरल्यामुळे पाटण तालुक्यात उठाव झाला.

पाटण : पाटणच्या लढतीबाबतचे राजकीय विश्लेषकांचे अंदाज धुळीस मिळवून लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे नातू शंभूराज देसाई यांनी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे पुत्र सत्यजितसिंह यांचा तब्बल १८,८२४ मतांनी पराभर करत नवा इतिहास रचला. सततच्या पराभवाची चिड आणि पेटून उठलेला देसाई गटाचा कार्यकर्ता व शंभूराज यांनी थंड डोक्याने वापरलेला गनिमी कावा यशस्वी ठरल्यामुळे पाटण तालुक्यात उठाव झाला. त्यातच पाटणकरांनी उमेदवारांनी बदलल्याने गटातील काही नाराजांनी आपला उद्रेक विरोधातून दाखवत पाटणकरांना हादरा दिला. त्यामुळे विक्रमसिंह पाटणकर हे कोयना, पाटण या बालेकिल्ल्यासह सर्वच पातळीवर अपयशी ठरले.पाटण विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी रविवार, दि. १९ रोजी सकाळी आठ वाजता सुरू झाली. शंभूराज देसाई हे प्रथमच गळ्यात भगवी पट्टी टाकून व डोक्यात गांधी टोपी घालून मतमोजणी केंद्रावर आले. तर सत्यजितसिंह पाटणकर त्यानंतर केंद्रावर पोहोचले. प्रथम कोयना विभागातील हेळवाक गटातील चौदा मतदान केंद्राचा मतमोजणीचा निकाल प्रथम लागला. त्यामध्ये १६९ मतांची आघाडी देसार्इंना देऊन गेली. कोयना, पाटण हे पाटणकरांचे बालेकिल्ले. तिथेच शंभूराज यांनी आघाडी घेतली. त्यामुळे देसार्इंचा कल दिसून आला. त्यानंतरच्या मतमोजणीच्या बारा फेऱ्यांमध्ये सत्यजितसिंह पाटणकर आघाडीवर होते.बाराव्या फेरीनंतर, सोळाव्या फेरीनंतर शंभूराज देसाई यांनी १,७६५ मतांची आघाडी घेत २९ व्या फेरीपर्यंत मुसंडी मारली. अखेर १८,८२४ मतांची विक्रमी आघाडी घेत शंभूराज देसाई निवडून आले. कोयना, पाटण, तारळे, मरळी, मल्हारपेठ, सुपने कुंभारगाव, तांबवे, चाफळ, मारुल हवेली अशा सर्वच जिल्हा परिषद गटांतून शंभूराज देसाई यांनी अलगद मुसंडी मारली.शंभूराज देसाई यांचे वाढते मताधिक्य पाहता, ते १३,५०० च्या मतांची आघाडी घेऊन पुढे होते. त्यानंतर फक्त चार फेऱ्यांची मतमोजणी करायची बाकी होती. तेव्हा दुपारी साडेतीनच्या सुमारास सत्यजितसिंह पाटणकर हे त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत निघून गेले. २००४ मध्ये ५,४०० मतांनी विजयी प्राप्त झाल्यानंतर पुन्हा शंभूराज देसाई यांना २००९ मध्ये ५८० मतांनी पराभवाला समोर जावे लागले होते. त्याआगोदर विक्रमसिंह पाटणकर यांच्यासमोरचे दोन निसटते पराभव शभूराज यांना जिव्हारी लागले होते. लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी १९८० मध्ये विक्रमसिंह पाटणकर यांचा पराभव केला होता. त्यानंतर विक्रमसिंह पाटणकर यांनी शंभूराज यांचे आई-वडील शिवाजीराव व विजयादेवी यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. जवळपास २२ हजार मतांनी पराभव झाला होता. त्यामुळे पराभवाचे चटके सोसलेल्या देसाई घराण्याच्या परतफेड करण्यासाठी शंभूराज यांनी पाटणकर विरोधात कंबर कसली होती.२०१४ च्या निवडणुकीत त्यांनी गत दोन वर्षांपासून केलेले नेटके नियोजन व घेतलेले परिश्रम आणि शिवसेनेचा खांद्यावर भगवा घेऊन तयारी केली. त्यातच तिकडे विक्रमसिंह पाटणकर यांनी सत्यजितसिंह यांचे लॉचिंग करण्याचे ठरविल्याने आणि त्यांनी तसे धाडस केल्यामुळे ते अंगलट आले आणि निवडणुकीत पाटणकर प्रत्येक टप्प्यात अयशस्वी ठरले.पाटण जिल्हा परिषद गटातील गतवेळेचे १२ हजारांचे मताधिक्य देखील याखेपेस पाटणकर हरवून बसले. आणि दुसरीकडे शंभूराज यांनी संपूर्ण तालुक्याला डोक्यावर घेतले. त्यातच सुपने, कुंभारगाव, तांबवे हे कऱ्हाडमधील विभागदेखील देसार्इंच्या बाजूने राहिले. त्यामुळे १८,८२४ मतांनी शंभूराज यांचा विजयी झाला.निवडणूक निर्णय अधिकारी संजीव जाधव यांनी शंभूराज देसाई विजयी झाल्याचे घोषित करताच मतमोजणी केंद्राच्या दोन्ही बाजूला उभ्या असलेल्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. त्यानंतर शंभूराज यांनी पाटण शहरात जाऊन लायबरी चौकातील गणेशाचे दर्शन घेतले. त्यावेळी याठिकाणी काही काळ तणाव निर्माण झाला. (प्रतिनिधी)पाटण ते मरळी कारखाना भव्य मिरवणूककऱ्हाड-चिपळूण रस्त्यावरील पाटणपासून शंभूराज देसाई यांची मिरवणूक सुरू झाली. म्हावशी येरफळे, अडूळ, नवारस्ता, मरळी, चोपदारवाडी येथील जनतेने त्यांचे भव्य स्वागत केले. महिलांनी हातामध्ये आरत्या घेऊन शंभूराज यांना ओवाळले.मरळी कारखाना परिसरात गुढ्या उभारल्याशंभूराज देसाई यांचे स्वागत करण्यासाठी मरळी गावात घरोघरी गुढ्या उभारल्या होत्या. पाटण शहरात सामसूम, दुकान बंदसत्यजितसिंह पाटणकर यांचा पराभव झाल्यामुळे पाटण शहरातील दुकाने बंद झाली, रस्त्यावर टायर पेटविण्यात आले. म्हावशी येथे पाटणकर समर्थकांनी दगडफेक केली. त्यामुळे तणाव निर्माण झाला.पाटणकरांना चिंतन करायला लावणारा निकालपाटण तालुक्यात पक्षापेक्षा देसाई व पाटणकर गट म्हणून जिल्ह्यात ओळखले जातात. मात्र, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शंभूराज यांच्याबाजूने लागलेला १८,८२४ या मताधिक्याचा निकाल पाटणकर गटाचे अस्तित्व दाखवून देणारा ठरला आहे. त्यामुळे यापुढील काही महिने, वर्षे पाटणकर गटाला चिंतन करायला लागणार आहे. पाटणची लढत म्हणजे अत्यंत चुरशीची व काठावरची असते. मात्र, याखेपेस अगदी सर्व गणित व समीकरणे मोडीत काढून शंभूराज यांनी लक्षणीय मताधिक्य घेतले.उमेदवारपक्षमिळालेली मते२सत्यजितसिंह पाटणकरराष्ट्रवादी८५,५९५३हिंदुराव पाटीलकाँगे्रस७,६४२4दीपक महाडिकभाजप२,१०२5रवींद्र शेलारमनसे६४३6शिवाजी कांबळेबसप४५५7हनुमंत पाटीललो.आं.पा.१५१डॉ. संदीप माने (शेतकरी कामगार पक्ष -१२५), प्रियांका साळुंखे (बहुजन मुक्ती पार्टी -८९)अपक्ष : सागर माने (२,०८४), दत्तात्रय भिसे (१,२८७), गणेश मोरे (८८८), चंद्रकांत यादव (२३७), सुनील कांबळे (२१२), बंडू गळवे (११०)(शंभूराज देसाई १८,८२४ मताधिक्याने विजयी) जनतेच्या दारात सत्ता आणण्यात यशस्वीपाटणच्या वाड्यात अडकलेली सत्ता जनतेच्या दारात आणण्यात यशस्वी झालो आहे. पाटणच्या जनतेने व माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास मी कधीच विसरणार नाही. लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा पुण्यकाळ पुन्हा पाटण तालुक्यात अवतरेल, असेच काम करुन दाखवेन. धनशक्तचा अस्त आणि जनशक्तीचा सुर्योदय झाला आहे.- शंभूराज देसाई, शिवसेनापाटणच्या जनतेसाठी सदैव कार्यरतपराभवाने खचून जावू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. सर्वांनी शांतता राखावी. जनतेने दिलेला कौल मी मान्य करतो. यापुढेही पाटणच्या जनतेसाठी सदैव कार्यरत राहीन. झालेल्या पराभवाची कारणे शोधून पुढील दिशा ठरवली जाईल.- सत्यजित पाटणकर, राष्ट्रवादी