शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते साताऱ्यात भ्रष्टाचाराचं रोपटं लावतात, उदयनराजेंची खरमरीत टीका 

By दीपक शिंदे | Published: April 24, 2024 4:55 PM

'माझ्या हातात घड्याळ, गळ्यात कमळ आणि खांद्यावर धनुष्य'

सातारा : महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेत्यांचे माझ्यावर खूपच प्रेम आहे. मला विरोध करण्यासाठी ते जिल्ह्यात चार चार सभा घेणार आहेत. माझ्या विरोधात त्यांना इतक्या मोठ्या जिल्ह्यामध्ये एकही चारित्र्यसंपन्न उमेदवार मिळाला नाही, आता ते घोटाळ्याचे रोपटे जिल्ह्यात लावण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी खरमरीत टीका लोकसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.सातारा येथील लेक व्ह्यू हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या आजी-माजी नगरसेवकांच्या बैठकीत ते बोलत होते. उदयनराजे म्हणाले, काँग्रेस पुरस्कृत महाविकास आघाडीला लोकांसमोर जाऊन मते मागण्याची नैतिकता राहिली नाही. या पक्षाला जनतेने पाठिंबा दिला. त्या पाठिंब्याच्या बळावर देशाला ५० वर्षे मागे खेचण्याचे पाप या पक्षाने केले आहे. देशाला प्रगतिपथावर नेण्यासाठी नरेंद्र मोदी प्रयत्न करत असताना नैतिकता नसलेले लोक विरोधाला विरोध करत लोकांमध्ये गैरसमज पसरवत आहेत.विकासाच्या मुद्यावर कायमस्वरूपी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. २१ व्या शतकात मोठी स्पर्धा जास्तीत जास्त विकासकामांची झाली पाहिजे, त्यासाठी एकी महत्त्वाची आहे. वेळ गेली की पुन्हा ती येऊ शकत नाही. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात कामे मार्गी लागायची असतील तर स्थिरता अत्यंत गरजेची आहे.

माझ्या हातात घड्याळ, गळ्यात कमळ आणि खांद्यावर धनुष्यजिल्ह्याला गतवैभव प्राप्त करून द्यायचे. चुटकीसरशी सगळे प्रश्न सोडवण्याची हिंमत माझ्यात आहे. माझ्या गळ्यात कमळ आहे. हातात घड्याळ, तर खांद्यावर धनुष्यबाण आहे. त्यामुळे या सर्व महायुतीच्या ताकतीच्या जोरावर भविष्यात सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे आमदार निवडून येतील, असा विश्वास उदयनराजेंनी व्यक्त केला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरsatara-pcसाताराlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसले