शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय पथकाकडून जखिणवाडीचे परीक्षण

By admin | Updated: October 30, 2015 23:44 IST

गावात दिवाळी : सडा, रांगोळ्यांनी सजले अंगण; पारंपरिक खेळांचे आकर्षण

मलकापूर : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात जखिणवाडी गावाने पुणे विभागात दुसरा क्रमांक मिळविल्याने राज्य पातळीवरील स्पर्धेत धडक मारली होती. या अभियानांतर्गत राज्यस्तरीय पथकाने गुरुवारी परीक्षण केले. या राज्यस्तरीय कमिटीचे गावात जंगी स्वागत करण्यात आले, तर सडा रांगोळ्यांनी गावाला सजविल्यामुळे गावात दिवाळीच साजरी झाली. शासनाच्या वतीने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात तालुका जिल्हा विभागातील व राज्यस्तरीय पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. जखिणवाडी गावाने शासनाच्या विविध १० पुरस्काराबरोबरच स्वच्छतेचे सातत्य राखत स्वच्छता अभियानात तालुका व जिल्हा पातळीवर प्रथम तर पुणे विभागात दुसरा क्रमांक पटकावत राज्यस्तरीय पुरस्कारासाठी पातळीवर प्रथम तर पुणे विभागात दुसरा क्रमांक पटकावत राज्यस्तरीय पुरस्कारासाठी पात्रता सिध्द केली होती. त्यानुसार राज्यस्तरीय पथकाने गुरुवारी जखिणवाडी गावाचे निरीक्षण केले. गावाने राबविलेल्या स्वच्छता मोहिमेचे सातत्य पाहून समितीने गावातील एकीचे कौतुक केले. बंदीस्त गटार, सौरग्राम, परसबागा, व्यायामशाळा, सांडपाणी व्यवस्थापन, बंदिस्त गटार यासह विविध नाविन्यपूर्ण योजनांची पाहणी केली. या पाहणी पथकात राज्याचे अप्पर सचिव वसंत माने, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता समितीचे अध्यक्ष भास्करराव पेरे, उगम ग्रामविकास संस्थेचे सुशांत पाईकराव, गोपुरी आश्रमशाळेचे न्योगी, प्रवीण पुरो, सतीश कोवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, गटविकास अधिकारी अविनाश फडतरे, सरपंच नरेंद्र पाटील, उपसरपंच महेश गुरव, ग्रामसेवक एन. डी. लोहार, तंटामुक्त अध्यक्ष रामचंद्र पाटील, पी. जी. पाटील यांच्यासह महिला सदस्या व ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी) महिलांच्या हाती सत्ता देशाला आदर्श राज्यस्तरीय निरीक्षण पथकाने पहाणी केल्यानंतर येथील मळाईदेवी मंदिरात स्वागत समारंभ घेण्यात आला. यावेळी राज्याचे अप्पर सचिव वसंत माने म्हणाले, ‘सर्वच्या सर्व महिलांना बिनविरोध निवडून देऊन गावाने देशाला आदर्श घालून दिला. हे गाव राज्यातच काय, देशात चमकेल असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.’ ‘आदर्श घेतल्यास इतिहास घडेलजखिणवाडीने स्वच्छता अभियानात सातत्य राखले हे आदर्शवत आहे. पण राज्यात इतर गावांनीही असाच आदर्श घेऊन स्वच्छता राखल्यास इतिहास घडेल. प्रत्येकाने स्वत:पासून सुरुवात केल्यास शासनाला अभियानच राबवावे लागणार नाही.’ असे मत राज्याचे अभियानाचे अध्यक्ष भास्करराव पेरे यांनी व्यक्त केले.