साताऱ्यात शाळकरी मुलगी गरोदर; तरुणावर पोक्सोचा गुन्हा

By दत्ता यादव | Updated: April 5, 2023 14:30 IST2023-04-05T14:30:31+5:302023-04-05T14:30:54+5:30

अज्ञान असल्याचा गैरफायदा घेऊन राहत्या घरामध्ये कोणीही नसताना त्याने पीडित मुलीवर वारंवार बलात्कार केला. 

School girl pregnant in Satara; POCSO offense against youth | साताऱ्यात शाळकरी मुलगी गरोदर; तरुणावर पोक्सोचा गुन्हा

साताऱ्यात शाळकरी मुलगी गरोदर; तरुणावर पोक्सोचा गुन्हा

सातारा : शहरातील एका १४ वर्षांच्या शाळकरी मुलीवर वारंवार अत्याचार करण्यात आला असून, यातून पीडित मुलगी गरोदर राहिली आहे. याप्रकरणी एका तरुणावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात पोक्सोचा गुन्हा दाखल झाला आहे. ऋतिक कदम (वय २०, रा. दाैलतनगर, सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित मुलगी १४ वर्षांची असून, ती एका शाळेत शिकत आहे. ऋतिक हा तिचा सतत शाळेपर्यंत पाठलाग करत होता. ती अज्ञान असल्याचा गैरफायदा घेऊन राहत्या घरामध्ये कोणीही नसताना त्याने पीडित मुलीवर वारंवार बलात्कार केला. 

काही दिवसांनंतर मुलगी गरोदर असल्याचे घरातल्यांच्या निदर्शनास आल्यानंतर पीडित मुलीच्या आईने शाहूपुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी ऋतिक कदमवर बलात्कारसह पोक्सोचा गुन्हा दाखल केला. महिला पोलिस उपनिरीक्षक वाघमारे या अधिक तपास करीत आहेत. 

Web Title: School girl pregnant in Satara; POCSO offense against youth