शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सौमित शहाच्या मृत्यूचे गूढ वाढलं, मैत्रिणीची कसून चौकशी; तपासासाठी पथके रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 17:46 IST

सौमितच्या मित्र-मैत्रिणींकडून मिळालेली माहितीच सौमितच्या मृत्यूचे गूढ उलगडणार आहे

शिरवळ : सांगली येथील प्रसिद्ध उद्योजक सुमेध शहा यांचा मुलगा सौमित शहा (वय २३) याच्या मृत्यूचे गूढ आणखीनच वाढत आहे. सौमितच्या मैत्रिणीची आणि मित्रांची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. यावरही विसंबून न राहता पोलिसांनी विविध ठिकाणी तपासासाठी दोन पथके रवाना केली आहेत. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनीही या प्रकरणामध्ये स्वत: लक्ष घातले असून, त्यांनी मंगळवारी घटनास्थळी भेट देऊन अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या.याबाबत माहिती अशी की, सांगली येथील प्रसिद्ध उद्योजक सुमेध शहा यांचा एकुलता एक मुलगा सौमित शहा हा शनिवार, दि. ५ रोजी कारने (क्रमांक एमएच १०-डिजी ६७७७) पाच मित्रांसमवेत पुण्याला गेला होता. यावेळी संबंधितांनी वाकड, पिंपरी चिंचवड परिसरातील एका हॉटेलमध्ये रूम घेतली होती. सायंकाळी जेवण करण्यासाठी सर्व मित्र थांबले होते. त्यावेळी अचानक सौमितने ‘मी मैत्रिणीला भेटून येतो,’ असे सांगून कार घेऊन निघून गेला. मात्र, उशिरापर्यंत तो आला नाही.

दरम्यान, रविवारी सकाळी त्याचा मृतदेह निरा नदीत सापडला. सौमितच्या गळ्यात सोन्याची चेन, अंगठी, हातामध्ये सोन्याचे कडे, डिजिटल घड्याळ व महागडा मोबाइल होता. या वस्तूही गायब आहेत. त्यामुळे त्याचा घातपात झाला आहे की काय, या अनुषंगानेही पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ज्या मैत्रिणीला तो भेटायला गेला होता, त्या पुण्यातील मैत्रिणीकडे आणि त्याच्या मित्रांकडे पोलिसांनी तपास केंद्रित केला आहे. त्यांच्या जबाबातून साैमितच्या मृत्यूबाबत वेगळी काही माहिती मिळतेय का, याचीही चाचपणी पोलिसांकडून सुरू आहे.तपास पथकावरच आता भरसौमितच्या मृत्यूचा उलगडा होण्यासाठी शिरवळ पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. दोन पथके पुणे आणि इतर ठिकाणी पाठविण्यात आली आहेत. आता या पथकावरच काय तो तपासाचा भर आहे. या पथकाला मिळालेली माहिती आणि सौमितच्या मित्र-मैत्रिणींकडून मिळालेली माहितीच सौमितच्या मृत्यूचे गूढ उलगडणार आहे

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस