शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
2
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
3
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
4
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
5
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
6
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
7
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
8
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
9
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
10
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
11
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
12
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
13
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
14
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
15
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
16
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
17
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
18
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
19
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
20
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्याचे कर्नल महाडिक काश्मीर सीमेवर शहीद

By admin | Updated: November 18, 2015 00:02 IST

कर्नल महाडिक व इतर दोघा जखमींना हेलिकॉफ्टरने श्रीनगर येथे १५ कॉर्पस्च्या लष्करी कमांड इस्पितळात आणण्यात आले

श्रीनगर : सीमेच्या पलीकडून पाकिस्तानातून येऊन जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील जंगलात लपून बसलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या संशयित अतिरेक्यांना हुसकावून लावण्याच्या कारवाईत भारतीय लष्कराचे कर्नल संतोष महाडिक शहीद झाले. ४१ राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग आॅफिसर असलेले कर्नल महाडिक सातारा जिल्ह्यातील आहेत.लष्करातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ३० व ३१ आॅक्टोबर दरम्यानच्या रात्री लष्कर-ए-तैयबा अतिरेक्यांची एक तुकडी कुपवाडा जिल्ह्यात हैहामा येथे सीमा ओलांडून भारतात घुसली होती. परंतु पाऊस व वर्फवृष्टीमुळे हे अतिरेकी जंगलातच अडकून पडले होते. या अतिरेक्यांना जंगलातून हुसकावून लावण्याची मोहीम लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्सची तुकडी व काश्मिरच्या विशेष पोलिस दलाने १३ नोव्हेंबरपासून हाती घेतली होती. राष्ट्रीय रायफल्सच्या या तुकडीचे नेतृत्व कर्नल महाडिक यांच्याकडे होते. अतिरेक्यांचा पाठलाग करत लष्करी जवान व पोलिसांची तुकडी मंगळवारी सीमेलगतच्या हाजी नाका येथील दाट जंगलात शिरली तेव्हा अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात कर्नल महाडिक व काश्मीर पोलिसांच्या विशेष कृती दलातील मजलून अहमद यांच्यासह आणखी एक पोलीस शिपाई जखमी झाला. कर्नल महाडिक व इतर दोघा जखमींना हेलिकॉफ्टरने श्रीनगर येथे १५ कॉर्पस्च्या लष्करी कमांड इस्पितळात आणण्यात आले. परंतु डॉक्टरांनी प्रयत्नांची शिकस्त करूनही कर्नल महाडिक यांचे प्राण वाचू शकले नाहीत. (वृत्तसंस्था)अतिरेक्यांची घुसखोरी वाढलीभारत व पाकिस्तान यांच्यातील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवरील बोलणी रद्द झाल्यापासून सीमेपलिकडून होणारी घुसखोरी व सीमेवरील गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. लष्कराच्या सूत्रांनुसार गेल्या वर्षी जम्मू-काश्मीरमध्ये सीमापार घुसखोरीचे ७० प्रयत्न झाले होते व त्यातून ६५ दहशतवादी भारतात घुसले होते तर १३६ जणांना पुन्हा सीमेच्या पलिकडे पिटाळले गेले होते. त्याआधी वर्ष २०१३ मध्ये २८० अतिरेक्यांनी घुसखोरीचे ९१ प्रयत्न केले होते व त्यातून लष्कराच्या तिपेडी सुरक्षा व्यवस्थेला चकवा देऊन ९७ अतिरेकी भारतात घुसण्यात यशस्वी झाले होते.सीमेवर पाकचा गोळीबारजम्मू: पाकिस्तानी सैनिकांनी जम्मू-काश्मीरच्या सांबा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर सोमवारी रात्रभर गोळीबार करून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) प्रवक्त्याने सांगितले की, पाकी सैन्याने सांबा सेक्टरच्या सीमाभागात आंतरराष्ट्रीय सीमेवर तीन ते चार राऊंड गोळ्या डागल्या. त्यानंतर सीमेवर तैनात जवानांनी संशयास्पद हालचालींचा शोध घेण्याकरिता प्रकाश निर्माण करणारे गोळे फेकले. परंतु काहीही आढळले नाही. या गोळीबारात कोणतीही हानी झाली नसून जवान पाळत ठेवून आहेत.