अखेर सत्यजित देशमुख भाजपात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 13:31 IST2019-09-16T13:30:25+5:302019-09-16T13:31:24+5:30

कऱ्हाड : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, विधानपरिषदेचे माजी सभापती दिवंगत शिवाजीराव देशमुख यांचे सुपुत्र सत्यजित देशमुख यांनी सोमवारी कऱ्हाड येथे ...

Satyajit Deshmukh finally entered BJP | अखेर सत्यजित देशमुख भाजपात दाखल

अखेर सत्यजित देशमुख भाजपात दाखल

ठळक मुद्देअखेर सत्यजित देशमुख भाजपात दाखलदेशमुख सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष

कऱ्हाड : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, विधानपरिषदेचे माजी सभापती दिवंगत शिवाजीराव देशमुख यांचे सुपुत्र सत्यजित देशमुख यांनी सोमवारी कऱ्हाड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.

यावेळी शिराळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार माजी मंत्री शिवाजीराव नाईक, सांगली भाजप जिल्हाध्यक्ष आमदार पृथ्वीराज देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सत्यजित देशमुख यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होत्या. त्याला सोमवारी मूर्तस्वरूप आले.

कऱ्हाड मध्ये महाजनादेश यात्रेनिमित्त मुक्कामी असणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेदरम्यान हा प्रवेश देण्यात आला. यावेळी त्यांच्यासोबत फत्तेसिंगराव देशमुख, संपतराव देशमुख, हणमंतराव पाटील, पी. वाय पाटील, बाजीराव शेडगे असे मोजकेच कार्यकर्ते उपस्थित होते.

 

कऱ्हाड येथे सोमवारी सत्यजित देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

Web Title: Satyajit Deshmukh finally entered BJP